शहरं
Join us  
Trending Stories
1
"निवृत्त होऊन ८ मिहिने झाले, तरी माजी CJI चंद्रचूड यांनी सोडला नाही बंगला"; सर्वोच्च न्यायालयाचं सरकारला पत्र
2
टेक्सासमध्ये महापूर! ५१ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता; ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयामुळे संकट ओढावलं?
3
दिल्ली हादरली! एकाच घरात सापडले ३ तरुणांचे मृतदेह; एकाची प्रकृती गंभीर, कारण काय?
4
१०, १५ किंवा २० वर्षे काम केल्यानंतर तुमच्या PF खात्यात किती पैसे जमा होतील? चला गणित समजून घ्या
5
"बॉयफ्रेंडला सांगून तुला संपवेन", पत्नी रोज देत होती धमकी; छळाला कंटाळलेल्या पतीने उचलले टोकाचे पाऊल
6
लिव्हरला सूज, हाताला सलाईन; रुग्णालयात उपचार सुरू असतानाही चिमुकल्याने तुळशीच्या पानावर साकारले विठूरायाचे चित्र 
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना अनुकूल, इच्छापूर्ती शक्य; मन प्रसन्न करणारा धनलाभाचा काळ!
8
"मला राजकारणात पडायचं नाही...", हिंदी सक्ती वादावर शरद केळकरची प्रतिक्रिया
9
Maharashtra Rain: पाऊस झोडपणार! पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट! ठाणे, नाशिकसह ८ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
10
इराण-इस्राइल युद्धानंतर पहिल्यांदाच समोर आले खामेनी! कुठे लपले होते 'सुप्रीम लीडर'?
11
गळा कापल्यानंतरही क्रिश जिवंत होता! दिल्लीतील दुहेरी हत्याकांडात आरोपीकडून धक्कादायक खुलासा
12
पैसा दुप्पट करण्याची सुवर्णसंधी! पोस्ट ऑफिसची 'ही' योजना ११५ महिन्यांत तुमचे पैसे करेल डबल
13
देशात ७० तास कामाची चर्चा; पण 'या' राज्याने घेतला मोठा निर्णय; आता फक्त १० तास काम, जास्त केलं तर...
14
डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी थेट भिडणार इलॉन मस्क; नव्या पक्षाची केली घोषणा! नाव काय ठेवलं?
15
प्रेम करणं महागात पडलं! आधी मुलीच्या घरच्यांनी पकडलं तोंडाला काळं फासलं अन्...; बॉयफ्रेंडची केली 'अशी' अवस्था 
16
Today's Horoscope: महत्त्वाचे निर्णय घेण्यात अडचणी येतील; तुमची राशी काय सांगतेय?
17
"छत्रपती संभाजी महाराजांनी १६ भाषा शिकल्या, ते मूर्ख होते का? शिवाजी महाराजांनी..."; आमदार संजय गायकवाडांचं वादग्रस्त विधान
18
विठ्ठल.. विठ्ठल.. जय हरी विठ्ठल; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पार पडली विठ्ठल - रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा
19
ट्रम्प यांच्या ‘बिग ब्युटिफूल’ विधेयकाचे कायद्यात रूपांतर ; कर्मचाऱ्यांसोबत पिकनिकमध्ये असताना केली स्वाक्षरी
20
आषाढी एकादशी: मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विठुरायाची महापूजा, नाशिक जिल्ह्याला सलग दुसऱ्या वर्षी मिळाला मान

पोषण आहाराचा तांदूळ अडगळीत !

By admin | Updated: January 19, 2015 00:26 IST

वरकुटे-मलवडी : जिल्हा परिषद शाळेतील प्रकार; ग्रामस्थांत चर्चा सुरू

वरकुटे - मलवडी : येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शालेय पोषण आहाराचा तांदूळ व इतर साहित्य अडगळीच्या खोलीत आढळून आले. यामुळे ग्रामस्थामध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे. याबाबत माहिती अशी की, वरकुटे-मलवडी, ता. माण येथील प्राथमिक शाळेत शनिवारी सकाळी नऊला शालेय व्यवस्थापन समितीची बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी शाळेतील अनेक विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये शाळेतील प्रगत-अप्रगत विद्यार्थ्यांविषयी चर्चा करण्यात आली. नवीनच तयार झालेल्या व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षपदी सुरेखा पिसे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.समितीने पोषण आहार ज्या खोलीत ठेवला आहे. त्या खोलीतील शिल्लक स्टॉकची पाहणी केली. यावेळी इतर शाळेतील खोल्यांची पाहणी केली असता एका खोलीत अडगळीच्या ठिकाणी दोन क्विंटल पन्नास किलो तांदूळ, दोन किलो हळदीच्या पाच पिशव्या आणि अर्धा किलोच्या सात पिशव्या, मोहरी पाव किलोच्या पाच पुड्या, पन्नास किलो हरभरा, गोडतेलाच्या दहा पिशव्या आदी साहित्य आढळून आले. यासंबंधी समितीने मुख्याध्यापिकांना विचारणा केली.एका खोलीत अडगळीच्या ठिकाणी मुलांचा शालेय पोषण आहार शिल्लक आढळून आल्याने ग्रामस्थामध्ये उलट-सुलट चर्चा सुरू आहे. समितीने खोलीत आढळून आलेल्या साहित्यांचा पंचनामा केला आहे. माण तालुका गट शिक्षण अधिकारी वामन जगदाळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी याबाबत हा प्रकार गैर नसावा, तरीही याबाबत चौकशी करू, असे सांगितले. (वार्ताहर)