शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

टंचाईग्रस्त वाड्यांची संख्या हजाराजवळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2019 23:19 IST

नितीन काळेल । लोकमत न्यूज नेटवर्क सातारा : जिल्ह्यात उन्हाळा सुरू झाल्यापासून टंचाईची स्थिती वाढली असून, सध्या २३१ गावं ...

नितीन काळेल ।लोकमत न्यूज नेटवर्कसातारा : जिल्ह्यात उन्हाळा सुरू झाल्यापासून टंचाईची स्थिती वाढली असून, सध्या २३१ गावं आणि ९५९ वाड्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालाय. तर तब्बल ४ लाख नागरिक आणि २ लाख पशुधन टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे. मान्सूनचा पाऊस लांबल्यास जिल्ह्यातील दुष्काळाची दाहकता आणखी वाढणार आहे.जिल्ह्यात गेल्यावर्षी पश्चिम भागात पाऊस झाला असला तरी पूर्व भाग मात्र, कोरडाच राहिला. सुरुवातीच्या काळात मान्सूनचा पाऊस झाला. पण, आॅगस्टनंतर पूर्व दुष्काळी भागात अपवादानेच पाऊस झाला. तसेच परतीच्या पावसानेही हुलकावणी दिली. त्यामुळे आॅक्टोबर महिन्यापासूनच माण तालुक्यातील अनेक गावांत टंचाईची स्थिती निर्माण झाली होती.माण तालुक्यातील सध्या ७८ गावे आणि ६१५ वाड्यांना ११३ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. या पाण्यावर १ लाख ४४ हजार ९८९ नागरिक आणि ६४ हजार ७०० पशुधन अवलंबून आहे. या तालुक्यासाठी टँकर खेपा २३५ मंजूर असल्या तरी शुक्रवारी फक्त १९२ झाल्या. खटाव तालुक्यातही टंचाईची तीव्रता वाढली असून ४८ गावं आणि १६६ वाड्यांसाठी ४३ टँकर सुरू आहेत. तालुक्यातील ९१ हजार ८८० नागरिक आणि ४२ हजार ७३९ पशुधन टँकरवर अवलंबून आहे. मागील आठवड्याच्या तुलनेत तालुक्यात १ टँकर वाढला आहे. कोरेगाव तालुक्यातही टंचाईची स्थिती असून, ३३ गावांना ३६ टँकरद्वारे पाणी पुरवठा सुरू आहे. ४९ हजार ५० नागरिक व २२ हजार ५१२ पशुधन टँकरवर तहान भागवत आहे.फलटण तालुक्यातही टंचाई गावांच्या संख्येत वाढ झालीय. तालुक्यातील ३४ गावं व १५० वाड्यांतील ७८ हजार ६२३ ग्रामस्थ आणि ४८ हजार २५२ पशुधनाला टँकरचा आधार आहे. तालुक्यात ३७ टँकरची चाकं दुष्काळग्रस्तांसाठी धावत आहेत. वाई तालुक्यात ८ गावं व ४ वाड्यांसाठी ७ टँकर सुरू आहेत. ६ हजार ३८३ ग्रामस्थ आणि ७ हजार ५८८ पशुधनाला टँकरवर अवलंबून राहावं लागतंय. खंडाळा तालुक्यात २ टँकर सुरू असून त्या माध्यमातून ३ गावांना पाणीपुरवठा सुरू आहे. महाबळेश्वर तालुक्यात सध्या ७ गावं आणि ३ वाड्यांसाठी ४ टँकर मंजूर आहेत. सातारा तालुक्यातही एक गाव आणि ५ वाड्यांना २ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झालाय. कºहाड तालुक्यातील ६ गावांत टंचाईची स्थिती आहे.पावसाचा तालुका अशी ओळख असणाऱ्या पाटण तालुक्यातील २ गावं अन् ७ वाड्यांना टंचाईची झळ बसलीय. तेथील ४ हजार ३८४ ग्रामस्थ आणि १ हजार ४२७ जनावरांसाठी ६ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला आहे. तर जावळी तालुक्यातही १३ टँकरची चाकं फिरत आहेत. या टँकरवर ११ गावं आणि ९ वाड्यांतील ११ हजार २६० ग्रामस्थ अवलंबून आहेत.