फलटण : मार्च महिना सुरू झाला आणि उन्हाची तीव्रता वाढू लागली की, रस्त्याकडेला घुंगरांचा नाद करत थंडगार उसाचा रस मिळणारी गुऱ्हाळे आपण नेहमी पाहतो; परंतु फक्त प्रवासातच उसाचा हा थंडगार रस आपणास पिण्यास उपलब्ध होत होता. परंतु आता हे गुऱ्हाळच आपल्या दारात येऊन उसाचा रस पुरवत आहे.
फलटणमधील ग्रामीण भागातील तरुणांनी अशा प्रकारच्या ऊस रसाच्या गाड्या तयार केल्या आहेत. या गाडीत ताजा ऊस, गुऱ्हाळयंत्र व इतर लागणारे सर्व साहित्य बसवलेले आहे. कमी जागेत अगदी व्यवस्थित ही गुऱ्हाळगाडी तयार केली आहे. अवघी एकच व्यक्ती ही गाडी व्यवस्थित चालवू शकते. जुन्या गाडीपासून बनविलेली ही गाडी नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
रोज दुपारी भरउन्हात ही गाडी परिसरात फिरते व नागरिकांना त्यांच्यासमोरच शुद्ध व ताजा रस पुरवते. उसाचा रस, तोही आपल्या दारात म्हटल्यावर नागरिक खर्च करून उसाचा रस घेतात. त्यामुळे आता रस पिण्यासाठी कुठे लांबच्या प्रवासाला जायची गरज नाही. ही गुऱ्हाळगाडी लवकरच इतर शहरातही दिसेल.
कोट आणि चौकट येणार आहे...
फोटो आहे...
११फलटण
फलटणमध्ये गुऱ्हाळच आपल्या दारात येऊन उसाचा रस पुरवत आहे.