शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Satara: महाबळेश्वर–पाचगणीतील २७० अनधिकृत बांधकामांना नोटिसा; सात दिवसांत काढण्याचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 17:42 IST

मंत्र्यांना साकडे घालणार

पाचगणी : महाबळेश्वर–पाचगणी परिसर हा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आला आहे. यामुळे या भागात कोणतेही बांधकाम करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेणे बंधनकारक आहे. मात्र, या नियमांकडे दुर्लक्ष करून तालुक्यात अनेक ठिकाणी विनापरवानगी बांधकामे उभारण्यात आल्याचे समोर आल्यानंतर प्रशासनाने कठोर भूमिका घेतली आहे. महाबळेश्वर तहसील कार्यालयाकडून तालुक्यातील २७० अनधिकृत बांधकामधारकांना नोटिसा बजावल्या असून, सात दिवसात बांधकामे काढून घ्यावीत, असे आदेश दिले आहेत.केंद्र शासनाच्या पर्यावरण व वन मंत्रालय, नवी दिल्ली यांनी १७ जानेवारी २००१ रोजी प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेनुसार महाबळेश्वर – पाचगणी परिसर इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आला आहे. तसेच मंजूर महाबळेश्वर - पाचगणी प्रादेशिक योजना २००२ ते २०२२ नुसार या क्षेत्रात कोणतेही नवीन बांधकाम करण्यापूर्वी जिल्हाधिकारी, सातारा यांची पूर्वपरवानगी घेणे अनिवार्य आहे. या नियमांचे उल्लंघन करून अनेक ठिकाणी विनापरवानगी बांधकामे उभारण्यात आल्याचे प्रशासनाच्या तपासणीत आढळून आले आहे.या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर तहसीलदार सचिन मेस्के यांनी संबंधितांना नोटिसा बजावून स्पष्ट केले आहे की, नोटीस प्राप्त झाल्यानंतर सात दिवसांच्या आत संबंधितांनी स्वखर्चाने अनधिकृत बांधकाम काढून घ्यावे. अन्यथा प्रशासनाकडून बांधकाम पाडण्यात येईल. त्यासाठी होणारा खर्च जमीन महसुलाच्या थकबाकीप्रमाणे संबंधितांकडून वसूल करण्यात येईल.दरम्यान, ग्राम महसूल अधिकाऱ्यांना संबंधित खातेदारांना नोटिसा बजावून त्याचा अहवाल तहसील कार्यालयात सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. प्रशासनाच्या या कारवाईमुळे तालुक्यातील अनधिकृत बांधकामधारकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

मंत्र्यांना साकडे घालणारपाचगणी – महाबळेश्वर पर्यटनावर स्थानिकांचा उदरनिर्वाह अवलंबून असल्याने घरांवर व व्यवसायांवर बुलडोझर चालविण्याचा निर्णय सहन केला जाणार नाही. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील आणि मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांच्याशी चर्चा करून स्थानिकांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. गरज पडल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा राजेंद्र शेठ राजपुरे यांनी दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mahabaleshwar-Panchgani: Notices Issued to 270 Unauthorized Constructions, Removal Ordered

Web Summary : 270 unauthorized constructions in Mahabaleshwar-Panchgani face demolition after notices were issued. District Collector permission is mandatory in the eco-sensitive zone. Authorities warn of demolition at owner's expense if constructions aren't removed within seven days.