शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नाही करत मनुवादाचं गुणगाण; वाढविणार आंबेडकरांची शान --रामदास आठवले;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2017 22:14 IST

कºहाड : ‘पंतप्रधान मोदी यांच्या सरकारमध्ये असलो तरी मी मनुवादींचा समर्थन करत नाही.

ठळक मुद्देआरक्षणास धक्का लावला तर सरकार पाडू

लोकमत न्यूज नेटवर्ककºहाड : ‘पंतप्रधान मोदी यांच्या सरकारमध्ये असलो तरी मी मनुवादींचा समर्थन करत नाही. मी अजिबात करीत नाही मनुवादींचं गुणगान, मला वाढवायची आहे आंबेडकर, अण्णाभाऊंची शान.. ज्या दिवशी दलितांच्या आरक्षणाला धक्का लावला जाईल, त्या दिवशी आम्ही हे सरकार खाली खेचू,’ अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी स्पष्ट केले.

येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये दलित महासंघाच्या वतीने आयोजित मैत्री परिषदेत ते बोलत होते. यावेळी दलित महासंघाचे संस्थापक प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड, ज्येष्ठ नेते किशोर तपासे, पुष्पलता सकटे, विजय यादव, ‘एमआयएम’चे जिल्हाध्यक्ष अल्ताफ शिकलगार, नगरसेविका माया भोसले, अमर गायकवाड, सादिकभाई शेख, रामभाऊ दाभाडे, भीमराव सावदकर, शरद गायकवाड उपस्थित होते.

आठवले म्हणाले, ‘भारताचे संविधान डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिले आहे. त्याला भाजपने बदलण्याची भूमिका मांडल्यास आम्ही सत्तेत राहणार नाही, त्यातून बाहेर पडू.’ रा. डॉ. सकटे म्हणाले, ‘दलित महासंघाची ५ जुलै १९९२ मध्ये कोल्हापुरातील बिंदू चौकात स्थापना झाली. या संघाच्या माध्यमातून काम करताना खूप अनुभव आले. आज खºया अर्थाने चळवळ करायची असेल तर बाबासाहेबांच्या सुटाकडे, बुटाकडे न बघता त्यांच्या बोटाकडे बघून चळवळ करावी लागेल.’प्रकाश वायदंडे यांनी प्रास्ताविक केले. जावेद नायकवडी यांनी आभार मानले. कार्यक्रमास दलित महासंघातील पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.आठवलेंच्या हाती दिली सकटेंनी कुºहाडआजच्या या मैत्री परिषदेत मंत्री रामदास आठवले यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत तर करण्यात आलेच. परंतु दलित महासंघाचे अध्यक्ष डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी त्यांना कुºहाड भेट दिली. याची उपस्थितांमध्ये चर्चा होती.पंतप्रधानांचा नकोय ‘सूट’.. हवाय बाबासाहेबांचा ‘बूट’‘आम्हाला नकोय पंतप्रधान मोदी यांचा पंधरा लाखांचा सूट, हवाय डॉ. बाबासाहेबांचा बूट, हे प्रस्थापित करतायेत फाटाफूट, त्यासाठी हवी आहे आपल्यात एकजूट, उघडण्या मनोवाद्यांची मूठ, मैत्रीची हवी आहे एकत्र वज्रमूठ’ अशी कविता प्रा. डॉ. मच्छिंद्र सकटे यांनी मैत्री परिषदेत सादर केली. त्याला उपस्थितांनी भरभरून प्रतिसाद दिला.बहुजन शिक्षक परिवाराचे निवेदनदुर्गम भागांत काम करणाºया शिक्षकांना विशेष भत्ता करावा, प्रशासकीय टक्केवारीनुसार शिक्षकांच्या बदल्या व्हाव्यात, ४५ वयापुढील शिक्षकांना दुर्गम भागात पाठवू नये, दुर्गम भागात शाळांची संख्या वाढवावी, अशा विविध मागण्यांचे निवेदन बहुजन शिक्षक परिवाराच्या वतीने प्रवीण लादे यांनी मंत्री आठवले यांना यावेळी दिले.