शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

पाटाचं पाणी नाही आलं; पोटपाणी मात्र अवघड केलं !

By admin | Updated: June 1, 2015 00:51 IST

महू-हातगेघर कालवा : रखडलेल्या कामामुळे शेतकऱ्यांच्या काळजात ‘कालवाकालव’

नीलेश भोसले - सायगाव  जावळी तालुक्यातील सायगाव पश्चिम विभाग हा पूर्वीपासून कोरडवाहू म्हणून ओळखला जातो. येथील पाणीप्रश्न हा प्रत्येक निवडणुकीत कळीचा मुद्दा बनला आहे. अनेक पंचवार्षिक निवडणुका आल्या आणि गेल्या. ना पाट झाला ना पाणी आलं. पोटपाणी मात्र अवघड झालं, अशी स्थिती येथील ग्रामस्थ तसेच शेतकऱ्यांची झाली असल्याचे दिसून येत आहे. निसर्ग कधीच पक्षपात करीत नाही. निसर्ग कधीच अनुशेष ठेवत नाही. निधी अडकला म्हणून पाऊस वर्षानुवर्षे रखडत नाही. बीलं अडकली म्हणून पाऊस पडायचा थांबत नाही. पण, येथील पाणीप्रश्न वर्षानुवर्षे तसाच आहे. काही दिवसांपूर्वी जिल्ह्यात वळिवाचा पाऊस पडला. या पावसाने काही ठिकाणी नुकसानही केले. तसेच जावळी तालुक्यातील सायगाव विभागालाही या वळिवाच्या पावसाने झोडपून काढले. पाऊस, एवढा मोठा होता की रखडलेले कालवे चक्क पाण्याने वाहू लागले होते. निसर्गाच्या औदार्याचीच प्रचिती यानिमित्ताने येथील जनतेला व शेतकऱ्यांना अनुभवायास मिळाली. जावळी तालुक्यातील सायगाव पश्चिम विभाग हा पूर्वीपासून कोरडवाहू म्हणून ओळखला जातो. येथील पाणीप्रश्न हा प्रत्येक निवडणुकीत कळीचा मुद्दा बनला आहे. प्रत्येक निवडणुकीत पाणीप्रश्न समोर आला आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने पाणीप्रश्नावर आश्वासनेही देण्यात आली होती. पण, येथे ना पाट झाला ना पाणी आलं. अशी स्थिती येथील झाली आहे. गेली अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता या सायगाव विभागावर राहिली आहे. दोन वर्षांपूर्वी महू-हातगेघर धरणांतर्गत कालव्याची खोदकामे करण्यात आली. दोन वर्षे पूर्ण होऊनही ना पाट पूर्ण झाले ना पाणी आले.येथील संपादित झालेली जमीन मात्र, कालव्याखाली गेल्याने ‘तेलही गेले अन तूपही गेले’ अशी स्थिती येथील अनेक शेतकऱ्यांची झाली आहे. याचा विचार होण्याची गरज आहे. प्रश्न आहे तरी काय ? या कालव्यासाठी खूप मोठं क्षेत्र संपादित झालं आहे. काही शेतकऱ्यांच्या संपूर्ण जमिनी या कालव्याखाली गेल्या आहेत. त्यामुळे त्यांचा उपजीविकेचा प्रश्न बिकट झाला आहे. खोदकामाच्या दोन्ही बाजूस अंदाजे तीस फूट जमिनी पडिक राहिल्याने त्याक्षेत्रावर आता कुसळही उगवत नाही. खोदकामामधून आता झाडे उगवून आली आहेत. तर काही ठिकाणी चक्क बैलगाड्या जाऊन चाकोऱ्या तयार झालेल्या आहेत. त्यामुळे हा कालवा आहे की दुसरे काय ? असा प्रश्न शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांत साशंकताच...शशिकांत शिंदे हे जलसंपदामंत्री झाले. येथील शेतकऱ्यांच्या अशा पल्लवीत झाल्या. परंतु कालव्याचे काम पुढे न सरकल्याने व जमिनीही कसता येत नसल्याने दोन्ही बाजुंनी शेतकऱ्यांची कोंडी झाली आहे. याप्रश्नावर आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले ठोस पावले उचलणार की पंचवार्षिकची वाट पाहवी लागणार याबाबत शेतकऱ्यांत साशंकताच आहे.