शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

जवानांची चिठ्ठी ना कोई संदेश...२५ दिवसांपासून संपर्क तुटला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 3, 2019 10:50 IST

काश्मीरमध्ये आज कैक जवान देशाच्या रक्षणासाठी तैनात आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव तेथील संपर्क सेवा बंद केल्याने गेल्या २५ दिवसांपासून जवान व कुटुंबीयांचा संपर्क होऊ शकला नाही.

ठळक मुद्देजवानांची चिठ्ठी ना कोई संदेश...२५ दिवसांपासून संपर्क तुटलाकाश्मीर स्थितीमुळे जिल्ह्यातील कुटुंबीय व्याकूळ

स्वप्नील शिंदेसातारा : ना मातृछत्र हरपल्याचे दु:ख, ना पुत्र प्राप्तीचा आनंद याची कोणतीही फिकीर न करता काश्मीरमध्ये आज कैक जवान देशाच्या रक्षणासाठी तैनात आहेत. सुरक्षिततेच्या कारणास्तव तेथील संपर्क सेवा बंद केल्याने गेल्या २५ दिवसांपासून जवान व कुटुंबीयांचा संपर्क होऊ शकला नाही. सातारा जिल्ह्यातील अशा हजारो जवानांच्या संदेशाची आस कुटुंबीयांना लागून राहिली असून, त्यांच्या मनामध्ये चिंतेचे काहूर माजले आहे.सातारा जिल्ह्याला अनेक वर्षांपासून सैनिकी परंपरा लाभली आहे. या जिल्ह्यातील प्रत्येक गावातील एकतरी तरुण सैन्यात कार्यरत आहे. प्रत्येक गावाच्या वेशीवर असलेल्या कमानी आणि शहिदांची स्मारके ही त्या जवानांच्या शौर्याची आठवण करून देतात. आजही भारतीय सैन्य, नौदल आणि वायूदलासह विविध फोर्समध्ये जिल्ह्यातील सुमारे ४० हजारांपेक्षा जास्त सैनिक कार्यरत आहेत.

केंद्र सरकारने राज्यघटनेतील ३७० कलम हटविल्याने जम्मू-काश्मीरमध्ये तणावजन्य परिस्थिती निर्माण झाली. तसेच सुरक्षिततेच्या कारणास्तव राज्यातील फोन, इंटरनेटसह सर्व संपर्क माध्यमे बंद केली आहेत. त्यामुळे तेथील लोकांचा संपर्क एकमेकांशी होत नाही. या निर्णयाच्या विरोधात स्थानिकांनी दगडफेक, निदर्शने केल्याने चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे.अशा परिस्थितीमध्ये साताऱ्यातील सुमारे पाच हजार जवान जम्मू-काश्मीरमध्ये आपली सेवा बजावत आहेत. त्यापैकीच एक असलेल्या प्रदीप यादव याच्या आईचे मागील आठवड्यामध्ये निधन झाले. तर सीआरपीएफमधील अमोल निकम यांच्या पत्नीने एका गोंडस बाळाला जन्म दिला आहे.

दु:खद आणि आनंददायी अशा दोन्ही घटनांची माहिती सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानांपर्यंत पोहोचली नाही. मात्र, ते कोणतीही फिकीर न करता देशसेवा बजावत आहेत. त्यांच्यासारखे हजारो जवान गेल्या २५ दिवसांपासून आपल्या कुटुंबीयांशी बोलू शकले नाहीत. त्यांची खुशाली न कळल्याने गावाकडे त्यांच्या संदेशाची वाट पाहत बसलेली कुटुंबे कासावीस झाली आहेत. कधी मोबाईल, फोन अन् इंटरनेटची सेवा चालू होतेय, याची ते प्रतीक्षा करीत आहेत.

ते सध्या सीआरपीएफमध्ये आहेत. आमचा मुलगा अर्णवला रोज मोबाईलवर वडिलांशी व्हिडीओ कॉलिंग करण्याची सवय आहे. मागील काही दिवसांपासून त्यांच्याशी संपर्कच होऊ शकला नाही. त्यामुळे अर्णव शाळेत जाईना. पप्पांशी बोलल्याशिवाय शाळेत जाणार नाही, असे म्हणतोय.-सुष्मिता पवार जवानाची पत्नी, सातारा

पोराशी चार तारखीला बोलले होते, तवापासन त्याची खबरबात नाय. टीव्हीवर बघतो काश्मीरमध्ये रोज दंगा व्हतोय. काळजी लागून राहिली हाय. पोरगं कस हाय, त्याची चिंता लागलीय.- उषा जाधव,जवानाची माता, कऱ्हाड 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरSatara areaसातारा परिसर