शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

ना निवडणूक ना आचारसंहिता.. तरी बाजार बंद

By admin | Updated: August 4, 2015 23:21 IST

शेतकऱ्यांकडून निषेध : पोलिसांनी शेतीमाल रस्त्यावर फेकल्याचा आरोप

पाचवड : ग्रामपंचायत निवडणुकीच्या रणधुमाळीत आचारसंहितेचे कारण पुढे करून पाचवड, ता. वाई येथील आठवडे मंगळवारी बाजार बंद पाडण्यात आला. कोणतीही पूर्व सूचना न दिल्याने मंगळवारचा आठवडा बाजार व जनावरांचा बाजार बंद पाडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी कृषिमाल रस्त्यावर फेकून दिला आहे, असा आरोप करत शेतकऱ्यांना या प्रकाराचा निषेध केला आहे.जिल्ह्यातील काही ग्रामपंचायतींसाठी मंगळवारी मतदान होत आहे. ज्या गावामध्ये निवडणूक आहे, त्या गावातच कोणताही कार्यक्रम अथवा आठवडे बाजार घेऊ नयेत, असा आदेश आहेत. पाचवडची कोणतीही निवडणूक नसताना महसूल खात्याने आठवडा बाजार बंद पाडल्याने शेतकरी व व्यापारी वर्गात नाराजी पसरली आहे. वाई तालुक्यामध्ये पाचवडच्या आठवडा बाजाराला महत्त्व आहे. शेतकऱ्यांच्या मालाची खरेदी-विक्रीचे हमखास ठिकाण म्हणून पाचवडचा आठवडा बाजार प्रसिध्द आहे. त्यामुळे येथे प्रत्येक बाजारात लाखोंची उलाढाल होत असते. पाचवडच्या आजूबाजूच्या गावांमध्ये ग्रामपंचायत निवडणूकीचे मतदान मंगळवारी होत असून पाचवडमध्ये मात्र या निवडणुकीचा कोणताही संबंध नाही. शेतकऱ्यांना भाजीपाला मंगळवारी पाचवडमध्ये घेऊन न येण्याची कोणतीही पूर्वसूचना नसताना अचानक आचारसंहितेच्या नावाखाली मंगळवारी सकाळपासूनच भाजीबाजार व फळबाजार बंद पाडण्यात आला. त्यामुळे जिल्ह्यातून आलेले सर्व व्यावसायिक व शेतकरी यांच्या शेतमालाचे व फळांचे अतोनात नुकसान झाले. काही शेतकरी बाजारात बसून माल विक्री करीत असताना अचानक आलेल्या पोलिसांनी भाजीपाला इतरत्र फेकून दिला. याचा जाब विचारला असता निवडणूक आचारसंहितेचे आदेश व कारण पुढे करण्यात आले. या प्रकारानंतर शेतकऱ्यांनी एकत्र येवून शासनाचा निषेध करण्यात आला. दरम्यान, शेतकऱ्यांनी महागाई व दुष्काळाचे सावट याचा सामना करून आणलेला शेतीचा माल हा कवडीमोलाने कुठे विक्रीस न्यायचा या विचाराने शेतकरी गर्भगळीत झाले. या सर्व घडलेल्या प्रकाराची योग्य ती दखल घऊन प्रशासनाने संबंधीत अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी शेतकरी, व्यापारी करू लागले आहेत. (वार्ताहर)पोलिसांनी भाजीपाला फेकलाशेतकऱ्यांनी मंगळवारी सकाळी शेतीमाल विक्रीसाठी बाजारपेठेत ठेवला असता त्याठिकाणी काही पोलीस कर्मचाऱ्यांनी येऊन शेतकऱ्यांचा माल अस्ताव्यस्त करून दमदाटी केली. आचारसंहितेच्या नावाखाली पोलिसांनी केलेल्या या कृत्याचा पाचवड बाजारपेठेतील शेतकरी व व्यापाऱ्यांनी निषेध व्यक्त केला.