शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
आजचे राशीभविष्य,२ मे २०२५: समोरून आलेल्या संधीचा फायदा उठवता येणार नाही
3
सकाळी उद्घाटन केल्यास त्रास कमी होतो; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मिश्कील टिप्पणी
4
तीन महिन्यांत ३६ हजार पर्यटकांकडून नागझिरा व्याघ्र प्रकल्पाची सफारी; सिमेंट काँक्रीटच्या जंगलाला कंटाळलेल्या नागरिकांचा आता वन पर्यटनाकडे वाढता कल
5
काय म्हणावं.. प्रेम एकीशी; लग्न मात्र तिच्या मैत्रिणीशी; लग्नाचे आमिष दाखवून त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवले
6
देशावर संकट, पण शत्रू भारताचे वाकडे करू शकणार नाहीत; भेंडवळ घटमांडणीचे भाकीत
7
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
8
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
9
विधान परिषदेचे माजी आमदार अरुण जगताप यांचं पहाटे निधन; संग्राम जगताप यांना पितृ शोक
10
इलेक्ट्रिक वाहन खरेदीवर २० लाखांपर्यंत सबसिडी; येत्या पाच वर्षांत ३० टक्के ई-वाहनांच्या नोंदणीवर भर
11
आजच्या मुलांना अतिलाडापासून वाचवायचं असेल तर..?
12
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
13
...तर तलवारीचा डौलही राहील आणि शानही !
14
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
15
मेडिकल कॉलेजमधील खर्डेघाशी थांबवा ! ‘एचएमआयएस’च्या इंटरनेट सुविधेसाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून ३२ कोटी २१ लाख रुपये
16
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
17
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
18
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
19
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 

नो वर्गणी, नो गुलाल अन् डॉल्बी ! 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 14:34 IST

सातारा : गणेशोत्सव म्हटला की मोठा डामडौल असे समजले जाते. पण, परळी भागातील सावलीसारख्या गावातील गणेश मंडळाने कोणताही गाजावाजा न करता आपला आदर्श इतरांसमोर ठेवला आहे. या मंडळाने अनेक उपक्रम राबविले असून ते वाखाणण्याजोगे आहेत. येथील गणेशोत्सवात वर्गण घेतली जात नाही तसेच गुलालाची उधळण व डॉल्बीचा आवाजही नसतो हे विशेष. 

ठळक मुद्देसावलीच्या गणेश मंडळाचा आदर्शवत उपक्रम चित्रफित अन् सामाजिक कार्यातून राबविलेले उपक्रम सजावट स्पर्धेत जिल्ह्यातून प्रथम क्रमांक

सातारा : गणेशोत्सव म्हटला की मोठा डामडौल असे समजले जाते. पण, परळी भागातील सावलीसारख्या गावातील गणेश मंडळाने कोणताही गाजावाजा न करता आपला आदर्श इतरांसमोर ठेवला आहे. या मंडळाने अनेक उपक्रम राबविले असून ते वाखाणण्याजोगे आहेत. येथील गणेशोत्सवात वर्गण घेतली जात नाही तसेच गुलालाची उधळण व डॉल्बीचा आवाजही नसतो हे विशेष. 

गणेशोत्सव म्हटला की तो मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. त्यासाठी हजारो रुपये खर्च करण्यात येतात. डॉल्बीचा दणदणाट असतो. पण, अलीकडील काळात याला फाटा मिळू लागला आहे. अशाचप्रकारे सातारा तालुक्यातील सावली या गावच्या गणेशोत्सव मंडळाचे कार्यही आदर्श घेण्यासारखे आहे.

साताºयापासून सुमारे २० किलोमीटर अंतरावर सावली हे गाव आहे. उरमोडी धरणाच्या वरच्या भागात असलेल्या या गावाची लोकसंख्या ६०० च्या आसपास आहे. येथे सार्वजनिक क्रिडा गणेश उत्सव मंडळ कार्यरत आहे. या मंडळाने आतापर्यंत विविध उपक्रम राबविले आहेत. या मंडळाला महाराष्ट्र शासनाचा २०१६ मध्ये सजावट स्पर्धेतील जिल्ह्यातून प्रथम क्रमांक  मिळाला आहे. तसेच २००८, २००९, २०१० ला गणराया अ‍ॅवॉर्डही मिळाला आहे. हे मंडळ वर्गणी घेत नाही तसेच गुलालही उधळला जात नाही, डॉल्बीचा दणदणाट नसतो.

विशेष म्हणजे गणेशोत्सवात ८० टक्केमहिलांचा सहभाग असतो. दरवर्षी मंडळाकडून ज्येष्ठ नागरिकांना एक रुपयात पढंरपूर यात्रा घडविली जाते.  यावर्षीही मडंळाने विविध उपक्रम हाती घेतले आहेत. परळी विभागातील शाळेतील गरजू मुलांना शालेय साहित्याचे वाटप तसेच परिसरातील ज्येष्ठांचा सत्कार करण्यात येणार आहे. या ज्येष्ठांची येण्याजाण्याची सोय मंडळाच्या वतीनेच करण्यात येणार आहे.  मंडळाची वैशिष्टे...

पारंपरिक वाद्यात गणेशमूर्तीची मिरवणूकवर्गणी विरहीत गणेशोत्सव आणि सामाजिक उपक्रमसमाजप्रबोधनात्मक सजावट सजावटीत इकोफ्रेंडली वस्तूंचा वापरपुरूषांऐवढाचा महिलांचाही सहभाग चित्रफित अन् सामाजिक कार्यातून राबविलेले उपक्रम असे वीर जवान तुझे सलाम व्यसनाला मुक्ती, जिवनाला गतीएकतरी रुजवूया बी...अण्णा हजारे एक आदर्श व्यक्तीमत्वलेक वाचावा, देश वाचवासंतांची शिकवण शिवचरित्र  खाशाबा जाधव यांचा जीवनपट...

यावर्षी क्रीडा वैभवात मानाचा तुरा रोवणारे व भारताला पहिले आॅलिंपिक पदक मिळवून देणारे सातारा जिल्ह्यातील खाशाबा जाधव यांचा जीवनपट दाखविण्यात येणार आहे. तसेच सातारा जिल्ह्यातील क्रीडारत्नांच्या कारकिर्दीला उजाळा मिळण्यासाठी चित्रफितद्वारे लघुपट सादर करण्यात येणार आहे.