शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 15:16 IST

Agriculture Sector Election CoronaVirus Satara : कोरोनामुळे मुदतवाढ मिळालेल्या माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही दाखल झाला नाही. मात्र, २५ अर्जांची विक्री झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजया बाबर, सहायक अधिकारी अतुल यलमर यांनी दिली.

ठळक मुद्देमाण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुलकोरोनामुळे मुदतवाढ मिळालेल्या बाजार समितीचे भवितव्य ठरणार

दहिवडी : कोरोनामुळे मुदतवाढ मिळालेल्या माण तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून अर्ज भरण्याच्या पहिल्या दिवशी एकही दाखल झाला नाही. मात्र, २५ अर्जांची विक्री झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी विजया बाबर, सहायक अधिकारी अतुल यलमर यांनी दिली.माण बाजार समितीत एकूण १८ संचालक निवडून द्यायचे आहेत, तर २०६५ मतदार माण बाजार समितीचे भवितव्य ठरवणार आहेत. या निवडणुकीसाठी मलवडी, म्हसवड, मार्डी या ठिकाणी ग्रामपंचायत व सोसायटीची प्रत्येकी दोन तर दहिवडीमध्ये सोसायटी, ग्रामपंचायत व व्यापारी अशी तीन मिळून एकूण ९ मतदान केंद्रे असणार आहेत.सोसायटीमधून ११ संचालक निवडून द्यायचे असून ८९५ मतदार आहेत. ग्रामपंचायतमधून ४ संचालक निवडले जाणार आहेत. यासाठी ८३५ मतदार आहेत, तर व्यापारीमध्ये ३३४ मतदार असून दोन संचालक निवडले जाणार आहेत. तोलाईमधून १ जागेसाठी एकच मतदार आहे. त्यामुळे ही जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे.निवडणुकीसाठी १२ जुलैच्या दुपारी ३ वाजेपर्यंत निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात अर्ज दाखल करता येणार आहेत. १३ जुलैला सकाळी ११ पासून अर्जांची छाननी करण्यात येईल. त्यानंतर वैध अर्जांची यादी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात प्रसिद्ध करण्यात येणार आहे. १४ जुलैपासून २८ जुलैला दुपारी ३ पर्यंत अर्ज मागे घेता येतील. २९ जुलै रोजी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करून चिन्हांचे वाटप करण्यात येणार आहे.

 आवश्यक असल्यास ७ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते दुपारी ४ पर्यंत मतदान घेण्यात येणार आहे. मतदानाचे ठिकाण नंतर जाहीर करण्यात येणार आहे. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ८ वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात होणार आहे. तसेच मतमोजणीचे ठिकाणही नंतर जाहीर करण्यात येणार आहे.

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रElectionनिवडणूकman-acमाणSatara areaसातारा परिसर