सातारा : येथील छत्रपती शाहू जिल्हा क्रीडा संकुलात पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेत सातारा बॉक्सिंग अॅकॅडमीच्या खेळाडूंनी नऊ सुवर्ण पदके पटकाविली. या स्पर्धेत १४ वर्षांखालील मुलांमध्ये आयुष मोकाशी (४८ ते ५० किलो वजनगट), १७ वर्षांखालील मुलींमध्ये श्रद्धा दळवी (४० ते ४२ किलो वजनगट), तृप्ती काकडे (६३ ते ६६ किलो वजनगट), १७ वर्षांखालील मुलांमध्ये संकल्प गाढवे (४४ ते ४६ किलो वजनगट), १९ वर्षांखालील मुलांमध्ये प्रतीक भोसले (४५ ते ४८ किलो वजनगट), शरद पवार (५४ ते ५७ किलो वजनगट), सागर जगदाळे (५७ ते ६० किलो वजनगट), मधुर भोसले (७५ ते ८१ किलो वजनगट) आणि अभिषेक पुजारी (८१ ते ९१ किलो वजनगट) या खेळाडूंनी सुवर्णपदक मिळविले. या सर्व खेळाडूंची सांगली येथे होणाऱ्या विभागीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेसाठी सातारा जिल्हा संघात निवड झाली आहे. आंतर विद्यापीठ विभागीय स्पर्धेत सातारा अॅकॅडमीची खेळाडू प्रियंका माने हिने ५४ ते ५७ किलो वजनगटांत सुवर्ण पदक पटकावले आहे. तिची निवड हरियाणा येथे होणाऱ्या अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी खेळाडूंचा वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सातारा बॉक्सिंग अॅकॅडमीचे मानद एनआयएस प्रशिक्षक सागर जगताप, हणमंत जाधव, सातारा बॉक्सिंग अॅकॅडमीचे पदाधिकारी हरीष शेट्टी, अमर मोकाशी, अरुण कापसे, पोलीस निरीक्षक पांडुरंग सूर्यवंशी, दौलतराव भोसले, माधव सुर्वे, विश्वास मोरे, नीलेश यादव, राहुल सूर्यवंशी, अनिता जाधव, मंजुळा जाधव, विजय मोहिते, मिलिंद काकडे यांच्यासह क्रीडा क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. (प्रतिनिधी)सातारच्या बॉक्सिंगला चांगले दिवससाताऱ्याला एक ऐतिहासिक क्रीडा परंपरा लाभलेली आहे. क्रीडा प्रकारात साताऱ्यातील खेळाडू चमकदार कामगिरी करत आहेत. सातारा बॉक्सिंग अॅकॅडमीमुळे तंत्रशुद्ध बॉक्सिंग खेळाडू तयार होत आहेत. स्पर्धांमध्ये सातारा बॉक्सिंग अॅकॅडमीतील खेळाडूंनी यश संपादन केले आहे. देश आणि जागतिक पातळीवर बॉक्सिंगमध्ये साताऱ्याला उज्ज्वल भविष्य आहे,’ असे गौरवोद्गार वेदांतिकाराजे भोसले यांनी यावेळी काढले.
नऊ सुवर्णपदकांची कमाई
By admin | Updated: October 12, 2015 00:38 IST