शहरं
Join us  
Trending Stories
1
Jagannath Yatra: जगन्नाथ यात्रेला गालबोट! पुरीतील गुंडीचा मंदिराजवळ चेंगराचेंगरी, तीन भाविकांचा मृत्यू, १० जखमी
2
"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी
3
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
4
केबिनमधून जळाल्याचा वास, चेन्नईला जाणारं एअर इंडियाचं विमान मुंबईत उतरवलं
5
सिंधू जल वाटप करारासंदर्भात भारताने आंतरराष्ट्रीय लवादाचा निर्णय फेटाळला; पाकिस्तानकडून मात्र निर्णयाचे स्वागत
6
१५-६४ वयोगटातील जगातील ६% लोकसंख्या ड्रग्जच्या विळख्यात, कोकेन ‘श्रीमंतांची फॅशन’
7
४० लाख भाविकांसाठी महाप्रसाद; पुरीमध्ये अदानी फाउंडेशनची सेवा
8
वीज प्रति युनिट १ ते १.३० रुपयांनी महागणार; महाराष्ट्र वीज ग्राहक संघटनेचा दावा
9
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
10
लग्नाचं आमिष दाखवून त्याने ५ वर्षांपासून…, RCBच्या स्टार खेळाडूवर शारीरिक शोषणाचा गंभीर आरोप
11
"तुझ्या कुंडलीत आकस्मिक मृत्यू...", शेफाली जरीवालाबाबत अभिनेत्याने केलेली भविष्यवाणी खरी ठरली
12
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
13
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
14
Panvel Crime News: प्रेमसंबंधातून जन्मलेल्या बाळाला फुटपाथवर फेकलं; २४ तासाच्या आत आरोपींना अटक
15
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
16
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील
17
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
18
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
19
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
20
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती

साताऱ्यात नऊ वर्षे दिसणार नऊ रूपं!

By admin | Updated: September 30, 2014 00:06 IST

नवदुर्गा : कामाठीपुरा येथील संघर्ष मित्र समूहानं साकारला ‘शैलपुत्री’ दुर्गावतार

सातारा : आपल्याला दुर्गादेवीची नऊ नावे माहीत असली तरी तिची नऊ रूपे पाहायला मिळत नाहीत. म्हणूनच कामाठीपुरा येथील संघर्ष मित्र समूहाने यंदापासून दुर्गादेवीची नऊ रूपे लोकांसमोर घेऊन येण्याचा प्रयत्न केला आहे. तिच्या नऊ रूपांपैकी पहिल्या ‘शैलपुत्री’ रूपातील मूर्तीची मंडळाने प्रतिष्ठापना केली आहे. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे बंगाल, गुजरात, महाराष्ट्र या राज्यातील मूर्तीचा अभ्यास करून ही मूर्ती बनविण्यात आली आहे. नऊ फूट उंचीच्या या मूर्तीच्या भाळी मळवट दिसतो, हे वेगळेपण आहे. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष राहुल महिपाल यांच्या संकल्पनेतून साकारलेली ही शैलपुत्री देवीची मूर्ती जिवंतपणाचा आभास निर्माण करते. मूर्तीत बारकावे यावेत, यासाठी दोन महिने काम चालले होते. डोळ्यातला सात्विक भाव दिसावा, यासाठी खास डोळ्यांसाठी कोल्हापूरहून कलाकार बोलावला होता. ही मूर्ती साताऱ्यातील संतोष कुंभार या कारागीराने बनविली आहे. गुजराती आणि बंगाली पद्धतीने देवीला साडी नेसविण्याचे अवघड धनुष्य अमृता वरगंडे यांनी लीलया पेलले आहे. दुर्गादेवीच्या नऊ पूजा बांधल्या जातात; पण नऊ रूपांतील मूर्ती पाहणे हा दुर्मिळ योग मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी येणार आहे. संघर्ष मित्र समूहाने तपपूर्ती साजरी करत असताना नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतले आहेत. त्याचाच हा एक भाग आहे. यासाठी अध्यक्ष माधव शेलार, उपाध्यक्ष मिलिंद साळुंखे, सहखजिनदार जितू साळुंखे, दिनेश साळुंखे व सभासद परिश्रम घेत आहेत. तसेच संघर्ष महिला मंचच्या वतीने महिलांसाठी विविध कार्यक्रम घेतले जातात. मंडळाने हिंदू-मुस्लिम ऐक्यही जपले आहे. मंडळाच्या स्थापनेपासून फरिद खान हे खजिनदार आहेत. मूर्तीची पहिली पूजा त्यांच्याच हस्ते बांधली जाते. पर्वतराज हिमालयाची मुलगी म्हणून जन्म घेतल्यामुळे तिला शैलपुत्री’ असे नाव पडले. पार्वती, हेमवती ही तिचीच नावे आहेत, अशी आख्यायिका आहे. नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी तिची पूजा आणि आराधना केली जाते. (प्रतिनिधी)दुर्गादेवीची नऊ रूपेशैलपुत्री, ब्रम्हचारिणी, चंद्रघंटा, कुश्मांदा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, चामुंडा, सिद्धीदात्री ही दुर्गादेवीची नऊ रूपे आहेत. या आदिशक्तीच्या एक एक रूपाची ओळख दरवर्षी करून देण्याचा प्रयत्न मंडळाच्या माध्यमातून केला जाणार आहे.आजकाल दुर्गोत्सव दांडिया आणि गरबा एवढ्यापुरताच मर्यादित होत चालला आहे. केवळ मनोरंजन म्हणून या उत्सवाकडे न पाहता या माध्यमातून विविध दुर्गावतारांची माहिती देऊन लोकांमध्ये प्रबोधन करण्याचे व्रत आम्ही हाती घेतले आहे.- राहुल महिपाल, संस्थापक अध्यक्ष, संघर्ष मित्र समूह