शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दुधाचे वाटप करत नववर्षाचे स्वागत, अंनिसचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 21:06 IST

सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वच उत्साहात असतात. अनेकजण दारूच्या नशेत बेधुंद होऊन डीजेच्या तालावर नाचून

सातारा : सरत्या वर्षाला निरोप देत आणि नववर्षाचे स्वागत करण्यासाठी तरुणाईपासून अबालवृद्धांपर्यंत सर्वच उत्साहात असतात. अनेकजण दारूच्या नशेत बेधुंद होऊन डीजेच्या तालावर नाचून थर्टीफस्ट साजरे करतात. अंनिसच्या वतीने दरवर्षीप्रमाणे रविवारी राजवाडा परिसरात ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ या मोहिमेद्वारे दुधाचे वाटप करून ‘दारू नको दूध प्या,’ असा संदेश दिला.सरत्या वर्षाचे आभार मानून कडू-गोड आठवणींचा संचय घेऊन आगामी वर्षात पदार्पण करताना अनेकजण दारूचा पहिला अनुभव घेतात. दारूच्या नशेत बेधुंद होऊन व्यसनाधीनतेकडे वाटचाल करतात. त्यामुळे अनेकांचे जीवन उद्धवस्त होते. तरुणाईला या व्यसनाधीनतेतून बाहेर काढण्यासाठी डॉ. नरेंद्र दाभोळकर यांनी गेली अनेक वर्षे ‘चला व्यसनाला बदनाम करू या’ ही मोहीम सुरू केली. या मोहिमेद्वारे अंधश्रद्धा निर्मूलन समिती व परिवर्तन व्यसनमुक्ती संस्था यांच्या वतीने ‘दारू नको दूध प्या’ हा उपक्रम सातारा शहरात राबवला जातो. यावेळी लाल बहादूर शास्त्री महाविद्यालयातील विवेकवाहिनीच्या कार्यकर्त्यांनी व्यसनमुक्ती या विषयावर पथनाट्य सादर केले. उपक्रमादरम्यान, ‘द दारूचा नव्हे, द दुधाचा,’ ‘नो चिअर नो बिअर, ओन्ली हॅप्पी न्यू ईयर,’ ‘हॅपी न्यू इयर हॅपी न्यू इयर, खाणार नाही गुटखा पिणार नाही बिअर,’ या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. नवीन संकल्प व नवी ऊर्जा घेऊन आप्तेष्टांबरोबर खाण्याबरोबर, संगीत व खेळांच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊन नवीन वर्षांचे स्वागत करा, असा संदेश देण्यात आला. यावेळी डॉ. शैला दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर, कुमार मंडपे, उदय चव्हाण, वंदना माने, भगवान राणदिवे, अजय ढाणे, डॉ. दीपक माने, प्रशांत पोतदार व कार्यकर्ते उपस्थित होते.