शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

कास ते सातारा नवीन २७ किलोमीटरची जलवाहिनी, खासदार उदयनराजे भोसलेंनी दिली माहिती 

By सचिन काकडे | Updated: June 26, 2023 19:14 IST

केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून या कामासाठी १०२ कोटी ५६ लाखांचा निधी मंजूर

सातारा : सातारा शहर व उपनगरांना पाणीपुरवठा करणाऱ्या कास धरणाची उंची वाढविण्यात आली असून, धरणातील पाणीसाठा पाच पटीने वाढला आहे. पुढील टप्प्यात कास धरण ते सातारा सुमारे २७ किलोमीटर लांब नवीन जलवाहिनीचे काम हाती घेतले जाणार असून, केंद्र शासनाच्या अमृत योजनेतून या कामासाठी १०२ कोटी ५६ लाखांचा निधी मंजूर झाला आहे, अशी माहिती खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.याबाबत प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद केले आहे की, कास धरणाची उंची वाढविण्यात आल्याने सातारकरांना सायफन पद्धतीने मुबलक पाणीपुरवठा होणार आहे. उंची वाढवल्याने, पूर्वीची ०.१ टीएमसी पाण्याची क्षमता असणारे धरण आता ०.५ टीएमसी क्षमतेचे झाले आहे. या वाढीव पाणीसाठ्याच्या सुयोग्य वितरणासाठी पूर्वीच्या बंदिस्त पाइपलाइनला समांतर नवीन अतिरिक्त जलवाहिनी नुकतीच केंद्र शासनाकडून मंजूर करून घेतली आहे. त्यानुसार नवीन जलवाहिनीच्या कामास आता सुरुवात होत आहे.या जलवाहिन्या कास धरण परिसरात दाखल झाल्या असून, आधुनिक तंत्रज्ञान वापरून त्या जुन्या जलवाहिनीशी समांतर अंथरल्या जाणार आहेत. कास योजना पूर्ण झाल्यानंतर शहापूर योजना नजीकच्या काळात बंद करून, त्या योजनेला कासचेच पाणी जोडले जाईल. तसेच कण्हेर उद्भव योजनेला देखील कासचे पाणी जोडण्यात येणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसले