शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

‘असले शेजारी’ नको रे बाबा..!

By admin | Updated: February 12, 2015 00:39 IST

‘झोपडपट्टी’ शब्दाची उच्चभ्रूंना अ‍ॅलर्जी : हक्काच्या जागेसाठी १७ कुटुंबांचा ‘फुटबॉल’

दत्ता यादव - सातारा  -झोपडपट्टी म्हटलं की, डोळ्यासमोर येते ती अस्वच्छता, अशिक्षितता, गुन्हेगारी स्वरूपाची पार्श्वभूमी असलेले लोक, या ठिकाणी वास्तव्य करतात. असा आजपर्यंतचा नागरिकांचा समज. परंतु संपूर्ण कुटुंबीय सुशिक्षित आणि शासकीय नोकरदार असलेल्या नागरिकांच्या वसाहतीला ‘झोपडपट्टी’चा धब्बा लागतो, त्यावेळी त्या लोकांकडेही बघण्याचा दृष्टिकोनही साहजिकच वेगळा नसतो, याचा प्रत्यय केसरकर पेठेतील बेघर झालेल्या १७ कुटुंबांना येत आहे. केसरकर पेठेतील वसाहतीची पालिकेने ‘झोपडपट्टी’ अशी दप्तरी नोंद केल्यामुळे या कुटुंबांना झोपडपट्टीचा शेजारधर्म नको रे..बाबा असे म्हणत त्यांना पर्यायी जागा देण्यास सातारकर धजावत नाहीत.येथील केसरकर पेठेमध्ये गेल्या तीस वर्षापासून पालिकेच्या आजी-माजी कर्मचाऱ्यांनी वसाहत थाटली आहे. सध्या या ठिकाणी एकूण १७ कुटुंबे वास्तव करत आहेत. जवळपास सगळ्यांनीच पक्की बांधकामे केलेली घरे बांधली आहेत. मात्र या वसाहतीमध्ये सध्या ‘एकात्मिक गृहनिर्माण झोपडपट्टी व सुधारणा योजने’अंतर्गत नवीन वसाहत २७ कुटुंबांसाठी बांधण्यात येत आहे. त्यामुळे सध्या पालिकेने या ठिकाणी राहणाऱ्या १७ कुटुंबांची घरे जमीनदोस्त केली आहेत. मात्र या सर्व कुटुंबांनी आमची राहण्याची पर्यायी व्यवस्था केल्याशिवाय इथून हलणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे हा वाद अखेर न्यायालयात गेला. पालिकेने या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, असा आदेश न्यायालयाने दिलाय. या नागरिकांना सुरूवातीला करंजे येथील पालिकेची मोकळी जागा दाखविण्यात आली. या कुटुंबांनी त्या जागेवर राहण्यास जाण्यास अनुकलताही दाखविली. मात्र तेथील लोकांनी विरोध केला. शाहूपुरीतील लोकांच्या दट्ट्यामुळे पालिका प्रशासनानेही नमते घेतले. पालिकेने पुन्हा दुसरी जागा निवडली. ती म्हणजे हुतात्मा स्मारकाशेजारील. या जागेवरही राहण्यास ही कुटुंबे तयार झाली. मात्र येथेही हीच परिस्थिती उद्भवली. स्वातंत्र्य सैनिकांनीही या ठिकाणी या लोकांना राहण्यास कडाडून विरोध केलाय. त्यामुळे केवळ हे झोपडपट्टीतील लोक आहेत, म्हणून त्यांना शेजारी करून घेण्यास नागरिक नकार देत आहेत, असा आरोप या कुटुंबांनी केला आहे. पालिकेने ‘झोपडपट्टी’ अशी नोंद केली नसती तर आज आमच्यावर ही वेळ आली नसती. इकडून-तिकडे केवळ आमचा फूटबॉल होत आहे. दीड महिन्यांपासून लाईट-पाण्याविना आम्ही वास्तव्य करत आहे. पालिका प्रशासन न्यायालयाचा आदेशही धुडकावत असून आम्हाला बेघर करत आहे, असाही आरोप नागरिकांनी केलाय.