शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
3
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
4
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
5
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
6
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
7
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
8
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
9
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
10
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
11
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
12
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
13
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
14
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
15
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
16
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
17
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
18
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
19
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?

संस्कृती संवर्धनासाठी लोकविद्यापीठाची गरज : प्रभाकर मांडे -अखिल भारतीय लोककला संमेलनाचे शानदार उद्घाटन-

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2018 00:07 IST

कऱ्हाड : ‘कोणत्याही गोष्टीच्या प्रचारासाठी लोककलेसारखे दुसरे कोणतेही प्रभावी माध्यम नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांनी याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत लोककलेला प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे.

ठळक मुद्दे; लोककलेच्या विविध स्तरावर स्पर्धा व्हाव्यात

कऱ्हाड : ‘कोणत्याही गोष्टीच्या प्रचारासाठी लोककलेसारखे दुसरे कोणतेही प्रभावी माध्यम नाही. त्यामुळे राज्यकर्त्यांनी याकडे सकारात्मक दृष्टीने पाहत लोककलेला प्रतिष्ठा मिळवून दिली पाहिजे. नाट्य स्पर्धांप्रमाणे लोककलेच्या स्पर्धा जिल्हा, विभाग आणि राज्य पातळीवर झाल्या पाहिजेत. शिवाय लोकसंस्कृतीकडे आमचे अक्षम्य दुर्लक्ष होत चालले आहे. त्यामुळे संस्कृती टिकविण्यासाठी लोकविद्यापीठ सुरू करण्याची गरज आहे,’ असे मत लोककलेचे गाढे अभ्यासक डॉ. प्रभाकर मांडे यांनी व्यक्त केले.

येथील यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनात शाहीर पठ्ठे बापूराव शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जयंती वर्षानिमित्त अखिल भारतीय लोककला संमेलन आयोजित करण्यात आले आहे. त्याच्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षपदावरून डॉ. मांडे बोलत होते. यावेळी राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, कºहाड जिमखान्याचे अध्यक्ष महिंद्र शहा, सचिव सुधीर एकांडे, लोकरंगच्या शैला खांडगे यांची प्रमुख उपस्थिती होती.डॉ. मांडे म्हणाले, ‘सामाजिक जीवन सुरू झाल्यापासून संशोधन हे सुरूच आहे. त्यामुळे नाविन्याचा शोध हा लागत गेला. अग्नी, चाकाचा शोध लागला. असे विविध शोध लागत गेले; पण हे शोध लागले असले तरी चित्र, गाणं ही आमची जगण्याची जुनी पद्धत होती.

आता मात्र, ती बदलू पाहत आहे. आमची श्रृजणशीलताच गेली आहे. आम्ही एकाकी होत चाललो आहे. एखाद्या वेळेला आम्ही दु:ख एकटेच प्रकट करू शकतो; पण आनंद एकट्याला व्यक्त करता येत नाही. हे एकटेपण माणसाला भयावह करते. याचे भान आम्ही ठेवायला पाहिजे.खरंतर आज कलेल्या बाबतीत बोलायचे झाले तर जीवनाच्या भान असणाऱ्या कला आज लोप पावत चालल्या आहेत. तर प्रेक्षाभान असणाºया कला फक्त जिवंत दिसतात. ही बाब विचार करायला लावणारी आहे.’ राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर म्हणाले, ‘लोककला हा तर भारतीय संस्कृतीचा गाभा आहे. त्यामुळे तो जोपासण्यासाठी राज्यात लोककला प्रशिक्षण देणाºया अ‍ॅकॅडमी सुरू होण्याची गरज आहे. कार्यक्रमास शहर व परिसरातील कलापे्रमी मोठ्या संख्येने उपस्थित होते....तर लोककला धोक्यात येईलएखादी कला दुसऱ्याला शिकवायची म्हटलं तर प्रशिक्षण कोण देणार? प्रशिक्षण द्यायचचं म्हटलं की त्याच मग शास्त्र होतं. आणि कोणतीही कला शास्त्रात बसली की त्याच मुक्तपण हरवून जातं. त्यामुळे लोककलेचं शास्त्र बनवल गेलं, त्याच प्रदर्शन केलं गेलं की लोककला धोक्यात येईल, असे मत मांडे यांनी व्यक्त केले.नवं स्वीकारा; पण मूळ सोडू नका !आमच्या संस्कृतीत आम्ही नव्याचा स्वीकार करतो. पहिल्याचं स्वत्व कायम ठेवून नवं स्वीकारल पाहिजे. कलाकारांनी तर परंपरेनी आलेली कला आणि त्याबरोबर नव्या कलेचा स्वीकार जरूर करावा; पण आपलं मूळ सोडू नये, असे आवाहन डॉ. मांडे यांनी यावेळी केले.पठ्ठे बापूरावांनी कला आणि जातीचं नातं तोडल!पठ्ठे बापूरावांनी कला अन् जात यांच नातं तोडलं. खऱ्या अर्थाने त्यांनी कलेला मुक्त केलं आणि शेवटपर्यंत त्यांनी कला जोपासली. रामजोशींसारखा डफ त्यांनी फोडला नाही. म्हणून त्यांच्या बंडखोरीच समर्थन आज या संमेलनाच्या निमित्ताने केलं जातयं, ही बाब कौतुकास्पद असल्याचे मत मांडे यांनी मांडले.यांचा झाला सन्मान...लोककलेबद्दल गेली पन्नास वर्षे अविरत काम करणारे डॉ. प्रकाश खांडगे, प्रा. डॉ. प्रभाकर मांडे, चंद्रकांत हिंगमिरे (कऱ्हाड), ज्येष्ठ रंगकर्मी मुकुंद कुलकर्णी, पठ्ठे बापूरावांचे दत्तकपुत्र बापूराव कुलकर्णी, अरुण गोडबोले, रघुवीर खेडकर आणि राष्ट्रपती पारितोषिक विजेत्या मंगला बनसोडे यांचा या संमेलनात मान्यवरांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला.

कऱ्हाड येथे अखिल भारतीय लोककला संमेलनाचे दीपप्रज्वलनाने उद्घाटन करताना डॉ. प्रभाकर मांडे व राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगावकर, यावेळी कºहाड जिमखान्याचे अध्यक्ष महेंद्र शहा, सचिव सुधीर एकांडे, नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, शैला खांडगे यांची उपस्थिती होती. दुसºया छायाचित्रात सुखदा खांडगे आणि प्रमिला लोदगेकर यांची कथ्थक व लावणीची जुगलबंदी कºहाडकरांना पाहायला मिळाली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmusicसंगीत