विक्रेत्यांमुळे कोंडी (फोटो : ०७इन्फो०२)
कऱ्हाड : शहरात विविध फळ विक्रेते मुख्य बाजारपेठेत बसलेले असतात. त्यांच्याकडून निम्मा रस्ता व्यापला जातो. परिणामी मुख्य बाजारपेठेत नाहक वाहतूक कोंडी होत आहे. ती टाळण्यासाठी फळविक्रेत्यांना खासगी जागेत बसण्याची सक्ती करावी. पोलिसांनी वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्यांवर ठोस कारवाई करावी, अशी मागणी होत आहे.
रस्त्यावर कचरा
कऱ्हाड : पाटण तिकाटणे परिसरात नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात रस्त्याकडेलाच कचरा टाकला जात आहे. तो हळूहळू रस्त्यावर पसरत आहे. त्यामुळे दुर्गंधी पसरत आहे. त्यातच उड्डाणपुलानजीक फळ व इतर वस्तूंचे विक्रेते बसतात. त्यांच्याकडूनही या ठिकाणी कचरा टाकला जातो. संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन त्वरित साफसफाई करण्याची मागणी होत आहे.
लग्नसराईमुळे गर्दी
मल्हारपेठ : पाटण तालुक्यातील महत्त्वाची बाजारपेठ असणाऱ्या मल्हारपेठ येथे खरेदीसाठी गर्दी होताना दिसत आहे. सध्या लग्नसराईचे दिवस आहेत. त्यामुळे कपड्यांसह भांड्यांची मोठ्या प्रमाणावर खरेदी होत आहे. या ठिकाणी कपडे, भांड्यांची मोठी दुकाने आहेत. तालुक्यातील ही मोठी बाजारपेठ असून लग्नसमारंभाच्या खरेदीसाठी या बाजारपेठेला पूर्वीपासून पसंती दिली जाते.