नवारस्ता, ता. पाटण येथे पाटण तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने आयोजित मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते.
नरेंद्र पाटील म्हणाले, दिवंगत अण्णासाहेब पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा त्याग केला आहे. तो वारसा तेवढ्याच ताकदीने पुढे चालवण्यासाठी मी या कार्यात स्वत:ला झोकून दिले आहे. त्यासाठी पायाला भिंगरी लावून संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढणार आहे. मराठा आरक्षणासाठी त्यांनी दिलेले बलिदान वाया जाऊ देणार नाही. न्यायालयात टिकणारे आरक्षण मिळवण्यासाठी व राज्य आणि केंद्र सरकारला भाग पाडण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. गायकवाड समितीने जो अहवाल दिला तो तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी मांडला होता. त्या सरकारमध्ये काम करत असताना या मुद्यावरून कधीही निवडणुकांमध्ये मत मागितले नाही. ज्या आर्थिक विकास महामंडळावर अध्यक्ष म्हणून काम पाहिले, महाराष्ट्रभर दौरे केले त्या माध्यमातून १३ हजार कोटींची मदत देऊन २० हजार मराठा तरुणांना याचा फायदा झाला आहे. त्यामुळे ८० हजार कुटुंब स्थिर झाली. मराठा समाजासाठीची ही चळवळ यापुढेही मोठ्या जोमाने पुढे घेऊन जाणार आहे. समाजातील तरूणांनी राजकारण विरहीत या चळवळीत सहभागी व्हावे. मराठा समाजाला संघटित करावे.
यावेळी भरत पाटील, नितीन सत्रे, अनिल संकपाळ, सचिन देसाई, भूषण जगताप, पवन तिकुडवे यांनी मनोगत व्यक्त केले. या मेळाव्यासाठी परिसरातील मराठा बांधव उपस्थित होते.