शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
3
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
5
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
8
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
9
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
10
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
11
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
12
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
13
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
14
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
15
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
16
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
17
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
18
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
19
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

पोलिसांसाठी खबऱ्यांचे सक्षम नेटवर्क गरजेचे --- सजन हंकारे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2019 23:54 IST

कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना या आपल्या नात्यातील लोकांकडून घडत असतात. या रोखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. - सजन हंकारे, पोलीस निरीक्षक, सातारा तालुका

ठळक मुद्देचर्चेतील व्यक्तीशी थेट संवाद - गुन्हा घडण्यापूर्वीच आरोपी सापडतील

दत्ता यादव ।पोलिसांची मदार सर्वसामान्य नागरिक आणि खबऱ्यांवर असते. हे लोक सतर्क असतील तर शंभर टक्के गुन्हे घडतच नाहीत. कोणत्याही प्रकारचे गुन्हे रोखायचे असतील तर त्यासाठी खबºयांचे नेटवर्क अत्यंत मजबूत असायला हवे. खबºयांचे नेटवर्क स्ट्राँग करण्यासाठी पोलीस निरीक्षक सजन हंकारे यांनी अनोखी पद्धत अवलंबली असून, यासंदर्भात त्यांच्याशी केलेली बातचित...

प्रश्न : गुन्हे घडूच नयेत, यासाठी काय करायला हवं?उत्तर : चार भिंतीच्या आत गुन्हे घडले तर ते बाहेर समजणे फार जिकिरीचे असते; परंतु सार्वजनिक ठिकाणी घडत असलेले बहुतांश गुन्हे नागरिकांच्या सतर्कतेमुळे टळत असतात. त्यामुळे नागरिक आणि पोलिसांचे सौहदर्याचे संबंध हवेत. यापेक्षाही पोलिसांसाठी खबºयांचे नेटवर्क महत्त्वाचे आहे. त्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे.

प्रश्न : खबºयांबाबत आपण वेगळी पद्धत काय अवलंबत आहात?उत्तर : प्रत्येक गावात एक तरी खबरी पोलिसांना ठेवावा लागतो. त्याच्याशी सतत संपर्क साधून त्याच्या अडीअडचणीला आम्हाला धाव घ्यावी लागते. पोलिसांबाबत त्यांच्यामध्ये विश्वास निर्माण केला जातो. तुझे काम हे दलाली नसून, कर्तव्य आहे. हे त्याला समजावून सांगितले जात आहे. त्यामुळे खबºयांचे नेटवर्क चांगले झाले आहे. कास पठारावर लूटमार करणारी टोळी असो की, दुचाकी चोरणारी टोळीचा उलगडा हा केवळ खबºयांमार्फतच झाला. यापुढे आणखी खबºयांचे नेटवर्क चांगले करण्यासाठी आमची टीम प्रयत्नशील राहणार आहे.

प्रश्न : कोणत्या गुन्ह्यांचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे?उत्तर : पूर्वी दरोड्याचे प्रमाण जास्त होते. मात्र, अलीकडे कौटुंबिक हिंसाचाराच्या घटना लक्षणीय घडत आहेत. तसेच मारामारी, छेडछाडीचे प्रकारही घडत असतात. यातील बहुतांश गुन्हे हे परस्परांच्या द्वेषभावनेतून तक्रारी केलेले असतात. त्यामुळे या गुन्ह्यांचे प्रमाण जास्त दिसत आहे. पोलीस ठाण्यात आल्यानंतर आम्ही अनेक कुटुंबांचे समुपदेशही करत असतो.जिल्ह्यात आठ वर्षांचा अनुभवपोलीस निरीक्षक सजन हंकारे यांना सातारा जिल्ह्यात काम करण्याचा आठ वर्षांचा अनुभव आहे. त्यामुळे गुन्हेगारांचे पाळेमुळे शोधून काढण्यात त्यांचा हातखंडा आहे. महाबळेश्वर, रहिमतपूर, फलटण या ठिकाणीही त्यांनी चांगली कामगिरी केली आहे. आत्तापर्यंत त्यांनी शंभरहून अधिक जणांना हद्दपार करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. 

सर्वसामान्यांना चांगली वागणूकपोलीस ठाण्यात आलेला प्रत्येक माणूस हा आरोपी नसतो. तो मुळातच पीडित असतो. त्यामुळे त्याच्याशी आपुलकीने वागले पाहिजे. त्याचे म्हणणे नेमके काय आहे, हे जाणून घेतले पाहिजे. माझ्यासह आमची टीम यासाठी नेहमी प्रयत्नशील असते. जो गुन्हेगार आहे, तो पोलिसांच्या नजरेतून कधीच सुटत नाही. त्याच्या डोळ्यातून आम्हाला सर्व समजते. सर्वसामान्यांना पोलिसांकडून कधीच त्रास होत नसतो.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरPolice Stationपोलीस ठाणे