शहरं
Join us  
Trending Stories
1
बेस्ट निवडणुकीचा निकाल लागताच राज ठाकरे वर्षा निवासस्थानी; CM देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट
2
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
3
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
4
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या सपशेल पराभवावर CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
5
Stock Market Today: शेअर बाजाराची मजबूत सुरुवात, Nifty २५,१०० च्या वर; NBFCs, रियल्टी शेअर्समध्ये तेजी
6
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर रामबाण तोडगा सापडला, हे मित्र बनणार भारतासाठी ढाल
7
सत्काराच्या शालीने वकिलाचा न्यायालयातच गळफास; खिशात चिठ्ठी, पण पोलिसांनी माहिती दडवली
8
मृत्यूच्या खाईत सौंदर्याचा सशक्त आवाज; पॅलेस्टाइनची तरुणी यंदा 'मिस युनिव्हर्स'मध्ये...
9
अदानींनी परदेशी बँकांकडून घेतलं 24000000000 रुपयांचं कर्ज! जाणून घ्या, एवढ्या मोठ्या रकमेचं काय करणार? किती व्याज लागणार? 
10
शाहरुखचा लेक त्याचाच डुप्लिकेट! लूक अन् आवाज सगळंच सेम, पहिल्यांदाच आला प्रेक्षकांसमोर, म्हणाला...
11
तीन विधेयकांवरून तुफान गोंधळ; विराेधकांनी प्रती फाडल्या, विधेयके संयुक्त समितीकडे पाठविली
12
अक्षय कुमार, अर्शद वारसी हाजिर हो..! दिवाणी न्यायालयात प्रकरण दाखल; कारण काय?
13
'त्याला मीच मारलं पण तो कोण होता?'; दहावीच्या विद्यार्थ्याची हत्या करणाऱ्या मुलाची धक्कादायक चॅटिंग समोर
14
आजचे राशीभविष्य, २१ ऑगस्ट २०२५: स्वाभिमान दुखावला जाऊ शकतो; स्त्री वर्गाकडून विशेष लाभ
15
विशेष लेख: चोरी ती चोरीच आणि वरून शिरजोरी? निवडणूक आयोगाने किती सांगितले अन् किती लपवले...
16
“वराह जयंती साजरी करण्याची मागणी म्हणजे तरुणांचे लक्ष दुसरीकडे वळवण्याचा अजेंडा”: सपकाळ
17
पर्युषण पर्वात कत्तलखाने १० दिवस बंद ठेवण्याच्या मागणीला कायदेशीर आधार काय? - उच्च न्यायालय
18
घरांच्या किमतींपेक्षा भाडे जास्त वेगाने वाढते आहे.... महानगरांतली वाढ तर चक्रावून टाकणारी !
19
मोनो ‘ओव्हरलोड’ झाल्यास थांबणार! अधिक प्रवासी झाल्यास गाडी पुढे न सोडण्याचा निर्णय
20
आजचा अग्रलेख: मनमानी आणि कंत्राटदारधार्जिणे निर्णय रोखून खाबूगिरीला चाप बसावा, म्हणून...

सातारा ‘जिल्ह्यात काँग्रेसला दाखवू राष्ट्रवादीची ‘रिअ‍ॅक्शन’!

By admin | Updated: September 11, 2014 23:03 IST

शशिकांत शिंदे : लोकप्रतिनिधींच्या बैठकीत जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीबाबत चर्चा

सातारा : ‘जिल्ह्यात काँगे्रस पक्षाकडून कुरघोड्यांची ‘अ‍ॅक्शन’ झाली तर राष्ट्रवादीकडूनही तेवढ्याच ताकदीने ‘रिअ‍ॅक्शन’ होईल,’ असा सज्जड दम पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी आज, गुरुवारी राष्ट्रवादी भवनात दिला. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीबाबत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या सर्व लोकप्रतिनिधींची बैठक झाल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी बोलताना राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर म्हणाले, ‘मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची कऱ्हाड दक्षिणमधील उमेदवारी तरी आधी जाहीर होऊ दे. मग बघू, काय करायचं ते. कारण फलटण मतदारसंघात त्यांचे कार्यकर्ते राष्ट्रवादीच्या पराभवाची भाषा करू लागले आहेत. या कार्यकर्त्यांना मुंबईतूनच ताकद मिळत आहे. असे जर असेल तर त्यांच्याही मतदारसंघात आम्हाला आमची ताकद दाखवावीच लागेल. ज्या रणजितला कृष्णा खोरेचे उपाध्यक्ष केले आहे, त्या पदाला साधा शिपाई बदलण्याचाही अधिकार नाही.’ दरम्यान, राष्ट्रवादी भवनात गुरुवारी झालेल्या बैठकीमध्ये सर्वच नेत्यांनी आपापल्या गोटातील नावांचे पत्ते खुले केले. या नावांसाठीच प्रत्येकजण आग्रही होता. बैठकीमध्ये जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी ‘पॉवरप्ले’ झाला. येत्या २0 सप्टेंबरला बारामतीकरांच्या आदेशानुसार या निवडी जाहीर केल्या जाणार आहेत. जिल्हा परिषदेतील पदाधिकारी निवडीवरून पक्षांतर्गत रस्सीखेच सुरू आहे. राष्ट्रवादी भवनात आज ही बैठक पार पडली. बैठकीला पालकमंत्री शशिकांत शिंदे, राज्य नियोजन मंडळाचे कार्याध्यक्ष रामराजे नाईक-निंबाळकर, खासदार उदयनराजे भोसले, जिल्हाध्यक्ष सुनील माने, माजी आमदार सदाशिव पोळ, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार मकरंद पाटील, तसेच जिल्'ातील राष्ट्रवादीचे इतर आमदार, जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील उपस्थित होते. स्थानिक आमदारांनी आपापल्या मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्याला हे पद मिळावे, यासाठी आग्रह धरला. पंचायत समिती सभापती व उपसभापतींच्या निवडीचा निर्णय त्या-त्या विधानसभा मतदारसंघातील आमदारांना त्याचे पूर्ण अधिकार देण्यात आले आहेत. खटाव व कोरेगाव पंचायत समिती सभापतिपदाच्या प्रश्नाबाबत शनिवारी (दि. १३) पुन्हा बैठक घेण्यात येणार असून, पालकमंत्री शशिकांत शिंदे, रामराजे नाईक-निंबाळकर यावर निर्णय घेणार आहेत. दरम्यान, दि. १६ सप्टेंबरला कोल्हापूर येथील गांधी मैदानावर सातारा, सांगली, कोल्हापूर येथील विधानसभा उमेदवारांच्या प्रचाराचा प्रारंभ होणार आहे, या कार्यक्रमाला जिल्ह्यातून २५ हजार कार्यकर्ते जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी बैठकीमध्ये स्पष्ट केले. (प्रतिनिधी)इच्छुकांच्या नावावर चर्चाजिल्हा परिषद अध्यक्षपद इतर मागास प्रवर्गासाठी राखीव आहे. या पदासाठी माणिकराव सोलवणकर, शिवाजीराव गावडे, आनंदराव शेळके-पाटील, शिवाजीराव शिंदे, सुभाष नरळे, मानसिंगराव माळवे, किशोर ठोकळे इच्छुक आहेत. उपाध्यक्षपदासाठी संजीवराजे नाईक-निंबाळकर, अमित कदम, राजू भोसले, रवी साळुंखे, सतीश चव्हाण, अनिल देसाई आदी नावांवर चर्चा करण्यात आली. याबाबत सविस्तर माहिती पक्षाचे अध्यक्ष शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांना देण्यात येणार आहे. त्यांच्या आदेशानुसारच कुठल्या समाजाला अध्यक्षपदासाठी प्रतिनिधित्व द्यायचे, याबाबत निर्णय होणार आहे.