शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीच्या सत्तेची गणिते सेना-भाजपवर अवलंबून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 00:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमेढा : जावळी तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींची निवडणूक आॅक्टोबर महिन्यात होत आहे. या निवडणुकीत सेना-भाजपची युती होणार की वेगवेगळे लढणार यावरच राष्ट्रवादीच्या सत्तेची गणिते मांडली जाणार आहेत. सध्या वर्चस्व असलेली राष्ट्रवादी ही सेना-भाजपची रणनिती भेदून आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.जावळी तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. काही ...

लोकमत न्यूज नेटवर्कमेढा : जावळी तालुक्यातील १५ ग्रामपंचायतींची निवडणूक आॅक्टोबर महिन्यात होत आहे. या निवडणुकीत सेना-भाजपची युती होणार की वेगवेगळे लढणार यावरच राष्ट्रवादीच्या सत्तेची गणिते मांडली जाणार आहेत. सध्या वर्चस्व असलेली राष्ट्रवादी ही सेना-भाजपची रणनिती भेदून आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहे.जावळी तालुक्यातील बहुतेक ग्रामपंचायती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहेत. काही ठिकाणी गटातटाची सत्ता असली तरीही राष्ट्रवादीच खºयाअर्थाने सत्तेवर आहे. तसेच तालुक्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार शशिकांत शिंदे यांचे वर्चस्व अबाधित आहे. शिवसेना तालुक्यातील प्रत्येक गावात आहे. मात्र, कणखर नेतृत्वाचा अभाव असल्याने या निवडणुकीत सेना तह करणार की शह देणार यावरच बरेचसे अवलंबून राहणार आहे.तालुक्यात १५ ग्रामपंचायतींपैकी बहुतांशी ग्रामपंचायती या कुडाळ भागातील असून, यामध्ये करहर, आखाडे, मोरघर, वालूथ, सोमर्डी या राजकीयदृष्ट्या संवेदनशील गावांचा समावेश आहे. मेढा विभागातील रिटकवली, कुसुंबी, ओझरे, केळघर या प्रमुख गावांमधील निवडणूक अटीतटीची होणार की बिनविरोध याबाबत मात्र साशंकता आहे.केळघर, कुसुंबी, रामवाडी, रुईघर, सोमर्डी, वालूथ, मोरघर, शिंदेवाडी, वाकी, आखाडे, भोगावली तर्फ कुडाळ, रिटकवली, करहर, ओझरे या गावांमध्ये प्रथमच थेट सरपंच निवड होणार आहे. कुडाळ भागात राष्ट्रवादीचे व जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष वसंतराव मानकुमरे, भाजपचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार, शिवसेनेचे तालुका प्रमुख प्रशांत तरडे यांच्या भूमिका महत्त्वाच्या ठरणार आहेत. कुडाळ भागात राष्ट्रवादी, भाजप, शिवसेना या पक्षांचीताकद आहे.