शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
5
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
6
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
7
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
8
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
9
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
10
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
11
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
12
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
13
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
14
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
15
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
16
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
17
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
18
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
19
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
20
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी नेत्यांच्या आदेशाला कोलदांडा!

By admin | Updated: January 13, 2016 22:27 IST

घडलंय-बिघडलंय : जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांकडून राजीनामा देण्यास टाळाटाळ

सातारा : जिल्ह्यात राष्ट्रवादी पक्षाच्या कारभाराच्या नाड्या ज्या दोन नेत्यांकडे आहेत, त्यांनी आदेश देऊनही जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी त्यांच्या आदेशाला बुधवारीही कोलदांडा दाखविला. येत्या दोन दिवसांत यावर निश्चित तोडगा निघून पदाधिकाऱ्यांच्या राजीनाम्यावर शिक्कामोर्तब होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. राष्ट्रवादी पक्षाचे राज्याचे नेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी राजीनामे देण्याचे आदेश दिले होते. ज्यांना पद मिळाले नाही, त्यांना संधी देण्याच्या सूचनाही केल्या होत्या. राष्ट्रवादी पक्षाचा जिल्ह्याचा कारभार पाहणारे विधानपरिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर व आमदार शशिकांत शिंदे यांनी याबाबत तोंडी आदेश देऊनही याबाबतची कार्यवाही झालेली नाही. पदाधिकाऱ्यांमधील इच्छुकांच्या आकांक्षांना अधिकच पंख फुटल्याचे चित्र आता पुढे आले आहे. ज्यांना याआधी पदे मिळाली आहेत, तेच पुन्हा नव्याने इच्छुकांच्या रांगेत उभे असल्याने राजकीय कोंडी होऊन बसली आहे. माण तालुक्यात राष्ट्रवादीला उतरती कळा लागली असल्याने याठिकाणी जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद देऊन बेरजेचे राजकारण करण्याच्या हालचाली वरिष्ठ पातळीवरून सुरू असतानाच स्थानिक पातळीवर मात्र पदांचा खो-खो सुरू असल्याचे चित्र आहे. (प्रतिनिधी) पदाधिकारी फिरकलेच नाहीत...! राष्ट्रवादी भवनात बुधवारी सकाळी अपेक्षेप्रमाणे रेलचेल सुरू होती. राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस राजकुमार पाटील व जिल्हा युवक अध्यक्ष अ‍ॅड. नितीन भोसले कार्यालयात उपस्थित होते. नेहमीप्रमाणे काही कार्यकर्तेही जा-ये करत होते. मात्र, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी या कार्यालयाकडे फिरकलेच नाही. जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्याशी संपर्क साधला असता तेही साताऱ्याबाहेरच होते. जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांना पक्षाच्या नेत्यांनी राजीनामे सादर करण्यासंदर्भात आदेश दिले आहेत. बुधवारी माझ्याकडे हे राजीनामे सादर होतील, अशी अपेक्षा होती. मात्र, अद्याप एकाही पदाधिकाऱ्याने आपला राजीनामा सादर केलेला नाही. - सुनील माने, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी