शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

काऊदऱ्यावर हजारो भाविकांकडून निसर्गपूजा, महिलांची मोठी उपस्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2019 13:32 IST

पाटण तालुक्यातील मणदुरे येथील पठरावरील असणाऱ्या काऊदऱ्यावर पुणे, सातारा, पाटण, तारळेबरोबर जेजुरी येथून आलेल्या भाविक तसेच निसर्गप्रेमींनी निसर्गपूजा केली. यावेळी महिलांना वनदेवी मानून त्यांना साडी अन् चोळी देत त्यांचीही पूजा करण्यात आली. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता निसर्गपूजेचा सोहळा पार पडला. यावेळी महिलांची मोठी उपस्थिती होती. निसर्ग संपत्तीचे जतन करा, तसेच संवर्धन करा, असा संदेश यावेळी निसर्गप्रेमींनी देत निसर्गाला नारळ अर्पण केला.

ठळक मुद्देकाऊदऱ्यावर हजारो भाविकांकडून निसर्गपूजा, महिलांची मोठी उपस्थिती निसर्ग संवर्धनाचा संदेश देत तुळशीच्या रोपांचे वाटप

पाटण : पाटण तालुक्यातील मणदुरे येथील पठरावरील असणाऱ्या काऊदऱ्यावर पुणे, सातारा, पाटण, तारळेबरोबर जेजुरी येथून आलेल्या भाविक तसेच निसर्गप्रेमींनी निसर्गपूजा केली. यावेळी महिलांना वनदेवी मानून त्यांना साडी अन् चोळी देत त्यांचीही पूजा करण्यात आली. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजता निसर्गपूजेचा सोहळा पार पडला. यावेळी महिलांची मोठी उपस्थिती होती. निसर्ग संपत्तीचे जतन करा, तसेच संवर्धन करा, असा संदेश यावेळी निसर्गप्रेमींनी देत निसर्गाला नारळ अर्पण केला.यावेळी पाटणचे उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे, तहसीलदार रामहरी भोसले, पोलीस निरीक्षक अप्पासाहेब मांजरे, मनसेचे तालुकाध्यक्ष नारकर, यादवराव देवकांत यांच्या हस्ते भंडाऱ्यांची उधळण करीत ही पूजा पार पडली. आपल्या आजूबाजूच्या परिसरातील निसर्गाने दिलेली देणगी तसेच सौंदर्य टिकून राहण्यासाठी झाडांचे संवर्धन केले पाहिजे, असे आवाहन जेजुरीहून आलेले भाविकांनी केले.यावेळी अन्नदान सेवा ट्रस्टच्या वतीने परिसरातील महिलांना वनदेवी मानून साडी चोळी व तुळशीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. यानंतर निर्सपूजेनंतर पालखी निवकणे मंदिराकडे पायवाटेने नेण्यात आली. या पालखीचा निवकणे येथे तीन दिवस मुक्काम असतो. तालुक्यातील असणारे निसर्गसौंदर्य जतन करावयाचे असल्यास प्रत्येक डोंगरदऱ्यात राहणाऱ्या लोकांकडून निसर्गाची पूजा केली जाते.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेSatara areaसातारा परिसर