कोपर्डे हवेली : कोपर्डे हवेली येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्पांतर्गत अकरा गावांतील राष्ट्रीय पोषण आहार पंधरवडा पार पडला. यावेळी सरपंच नेताजी चव्हाण, उपसरपंच शुभांगी चव्हाण, ग्रामविकास अधिकारी शिवाजी लाटे, बीटच्या प्रमुख शिकलगार, तसेच ग्रामपंचायतीचे सदस्य, सदस्या, गरोदर माता, अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या.
यावेळी उपसरपंच शुभांगी चव्हाण म्हणाल्या, लहान मुलांना बाहेरच्या खाद्य पदार्थांपासून दूर ठेवले पाहिजे. मुलांची स्वच्छतेबरोबर त्यांचा आहार, आरोग्य, लसीकरण, हॅन्डवाॅश, सॅनिटायझर, मास्क, आदी गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे. आहारामध्ये डाळींचा वापर केला पाहिजे.
यावेळी गरोदर, स्तनदा मातांना बेबी कीटचे वाटप करण्यात आले.
अकरा गावांतील अंगणवाडी सेविकांनी पोस्टिक आहाराचे स्टाॅल उभारले होते. कोपर्डे हवेली, अंतवडी, शामगाव, नडशी, शाहापूर, शिरवडे, वडोली निळेश्वर, उत्तर कोपर्डे, कोपर्डे हवेली आदींसह इतर गावांचा समावेश होता.
बीटप्रमुख शिकलगार यांनी प्रास्ताविक केले. अंजना थोरात यांनी सूत्रसंचालन केले.
फोटो २७कोपर्डे हवेली
कोपर्डे हवेली येथे अंगणवाडी बीटचा पोषण आहार कार्यक्रम पार पडला. यावेळी सरपंच नेताजी चव्हाण, उपसरपंच शुभांगी चव्हाण, शिवाजी लाटे उपस्थित होते.