शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नटराज महोत्सव : जागरण, गोंधळ नृत्याविष्काराची सांगता

By admin | Updated: February 13, 2015 00:51 IST

‘नृत्य संचित’ ही नृत्य नाटिका सादर करताना नाट्यशास्त्रावर आधारित तब्बल चार भाषेतील हे नाट्य सादर झाले

सातारा : पुणे येथील ‘नडनम’ या नृत्य संस्थेच्या गुरू केतकी काळे यांच्यासह वीस शिष्यांच्या विविध सात नृत्य शैली प्रकारातील बहारदार नृत्यांनी नटराज संगीत-नृत्य महोत्सवातला चौथा दिवस गाजवला. ही नृत्ये सादर होताना कलाशिक्षिका दीपिका शिंगटे यांनी नृत्य करणाऱ्या नटराजाचे चित्र रेखाटत एक अनोखा अविष्कार साकारला.  नृत्य कार्यक्रमाची सुरुवात कलाकारांनी गणेश वंदनाने केली. यानंतर ‘जोग’ रागातील आदितालातील पुष्पांजली साकारत नृत्य सादर करण्यात आले. त्यानंतर नृत्याची देवता अर्थात नटराजाचे कौतुक करणारी ‘नटेश कौत्वम’ या रचनेवर नृत्य सादर झाले.‘नृत्य संचित’ ही नृत्य नाटिका सादर करताना नाट्यशास्त्रावर आधारित तब्बल चार भाषेतील हे नाट्य सादर झाले. त्यानंतर नवरस पूर्ण अशा शास्त्रीय व लोकनृत्यामध्ये देशात सादर होणारे कुचीपडी, ओडीसी, मणीपुरी, कथकली, कथ्थक, मोहिनी अट्टम आणि भरतनाट्यम् हे सात विविध नृत्य प्रकार अतिशय सुरेखपणे सादर केले गेले. देशातील काश्मिरी नृत्य, गुजरात मधील गरबा, दांडिया व महाराष्ट्रातील जागरण, गोंधळ सादर करून या नृत्याविष्काराची सांगता झाली. कार्यक्रमाचे नेत्रा जोशी यांनी सूत्रसंचलन केले. नृत्यामध्ये सहभागी झालेल्या कलाकारांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थितहोते. (प्रतिनिधी)