शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

नांदोशी पूल बनलाय मृत्यूचा सापळा, अनेकजण जायबंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2019 16:51 IST

औंध ते सातारा रहदारीच्या रस्त्यावरील नांदोशी पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या पुलाच्या दुरवस्थेमुळे अनेकांनी आपले प्राण गमवाले आहेत. मागील अनेक वर्षांपासून पुलाच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई के ली नसल्याने हा पूल मृत्यूचा सापळा बनलाय. नांदोशी पुलाच्या कामास केव्हा मुहूर्त लागणार? असा प्रश्न स्थानिकांसह वाहनधारकांना पडला आहे.

ठळक मुद्देकामास केव्हा मुहूर्त लागणार? पुलाची अवस्था बिकटलवकर काम करण्याची मागणी

औंध : औंध ते सातारा रहदारीच्या रस्त्यावरील नांदोशी पुलाची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या पुलाच्या दुरवस्थेमुळे अनेकांनी आपले प्राण गमवाले आहेत. मागील अनेक वर्षांपासून पुलाच्या दुरुस्तीसाठी बांधकाम विभागाने कोणत्याही प्रकारची कारवाई के ली नसल्याने हा पूल मृत्यूचा सापळा बनलाय. नांदोशी पुलाच्या कामास केव्हा मुहूर्त लागणार? असा प्रश्न स्थानिकांसह वाहनधारकांना पडला आहे.रहदारीचा व वाहतुकीसाठी प्रमुख असणारा हा नांदोशी पूल औंध ते सातारा, कºहाड, सांगली, विटा या मार्गावरील वाहतुकीसाठी घाटमाथा हा महत्त्वाचा मार्ग आहे. मात्र, मागील अनेक वर्षांपासून नांदोशी येथील पूल प्रचंड रहदारी व वाहतुकीमुळे दोन्ही बाजूंनी खचला आहे. या पुलाची दगडे निसटू लागली आहेत. तसेच या पुलाला झाडाझुडपांचा विळखा बसला आहे. मागील पाच वर्षांत अपघातामुळे सुमारे सात ते आठजणांनी आपले प्राण गमवाले आहेत. तर शेकडोजण जायबंदी झाले आहेत.हा पूल म्हणजे मृत्यूचा सापळा असून, या पुलांवरून येणारी वाहने ही सुसाट येतात. याठिकाणी दोन्ही बाजूला टाकलेले स्पीडब्रेकर ही आता अवजड व सततच्या वाहतुकीमुळे खराब झाले आहेत. त्यामुळे पुन्हा हे क्षेत्र अपघात प्रवण क्षेत्र बनले आहे. नांदोशीसह या मार्गावरील आणखी दोन छोटे पूल ही डबघाईला आले आहेत. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेल्या या मार्गावरील पुलांचे रुंदीकरण करून उंची वाढवावी व वाहतुकीसाठी हा मार्ग सुलभ करावा. तसेच या मार्गावरील अन्य छोटे पूल ही नादुरुस्त झाले आहेत.औंध भागातील औंध ते फलटण, औंध ते कुरोली, वडूज, औंध ते गोपूज रस्त्याची कामे सुरू आहेत. तसेच या रस्त्यांंचा दर्जा ही बदलला आहे. मात्र, औंध ते घाटमाथा या प्रमुख रहदारीच्या पाच किलोमीटर मार्गाचे रुंदीकरण व डांबरीकरण व पुलाच्या दुरुस्तीचे काम करावे, अशी मागणी केली जात आहे.

सगळीकडे रस्त्याची, पुलाची कामे सुरू आहेत. अनेक निष्पाप लोकांचा बळी घेतलेल्या या पुलाचे काम नेमके कशात अडकले आहे. याचा शोध घेणे आवश्यक आहे. प्रशासनाने लोकांचा अंत पाहू नये. काम लवकरात लवकर सुरू करावे.- नवल थोरात 

टॅग्स :pwdसार्वजनिक बांधकाम विभागSatara areaसातारा परिसर