शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

नानांची सत्तेची भूक अजूनही संपता संपेना !

By admin | Updated: February 10, 2017 22:22 IST

मदनराव मोहिते : त्यांचं जॅकेट जनताच उतरवेल; बाबांची दक्षिणेतील निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाळ अजूनही तुटलेलीच

कऱ्हाड : आनंदराव पाटील यांनी जिल्हा काँग्रेसचे अध्यक्षपदही अडवून ठेवलंय. विधानपरिषदेची आमदारकी त्यांच्याच घरात. पुतण्या बाजार समितीवर संचालक. आता मिसरुड फुटलेल्या मुलाला जिल्हा परिषद सदस्य करण्यासाठी ते उतावळे झालेत. नानांची सत्तेची भूक अजूनही संपता संपेना. पृथ्वीराजबाबांना निष्ठावंत कार्यकर्त्यांकडे बघायला वेळ मिळेना म्हणून वैतागूनच आपण त्यांचा निरोप घेण्याचा निर्णय घेतला आहे. मनमानी करणाऱ्या नानांचे जॅकेट जनता उतरविल्याशिवाय राहणार नाही,’ अशी टीका ज्येष्ठ नेते मदनराव मोहिते यांनी केली.विंग, ता. कऱ्हाड येथे जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या प्रचाराचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर जाहीर मेळाव्यात ते बोलत होते. यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले, भाजपचे प्रदेश चिटणीस डॉ. अतुल भोसले, कऱ्हाडच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, पैलवान आनंदराव मोहिते, मुकुंद चरेगावकर, धोंडिराम जाधव, दाजी जमाले, वि. तु. सुकरे, श्रीरंग देसाई, सचिन पाचुपते, अनिल कचरे, कोयना वसाहतीचे सरपंच राजेंद्र पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती. मदनराव मोहिते म्हणाले, ‘दक्षिणेत उरावर बसलेलं उंडाळ्याचं भूत गाडण्यासाठी घरच्यांचा विरोध पत्करून पृथ्वीराजबाबांना विधानसभेला मदत केली. लोकं म्हणतात की दादा तुमच्यामुळे बाबा निवडून आले. मी तसं म्हणत नाही; पण पृथ्वीराजबाबांना निवडून आणण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केले. त्याला यश आले. बाबा आमदार झाले. ते कार्यकर्त्यांना चांगली वागणूक देतील, असं वाटत होतं. मात्र, बाबांची आणि दक्षिणेतील निष्ठावंत कार्यकर्त्यांची नाळ आजही जुळलेली दिसत नाही. दरबारी राजकारणात पारंगत असलेल्या बाबांना इथले राजकारण समजायला खूप वेळ लागेल. माझ्यासारख्या स्वाभिमानी माणसाला त्या दोघांची कार्यपद्धती न पचणारी आहे. म्हणून हा निर्णय घ्यावा लागला.’विलासराव पाटील-उंडाळकर यांचा समाचार घेताना मदनराव मोहिते म्हणाले, ‘त्यांनी मतदार संघात किती संस्था काढल्या हा संशोधनाचा विषय आहे. एक रयत कारखाना काढला; मात्र तो मयत होतोय, असे वाटताच तो भाड्यानं चालवायला दिला. त्यांनी आता दक्षिणच्या सत्तेची स्वप्न पाहू नयेत.’ डॉ. सुरेश भोसले म्हणाले, ‘दिवंगत यशवंतराव मोहिते भाऊ व जयवंतराव भोसले यांनी या भागात विकासाचं स्वप्न सत्यात उतरविण्याचं काम केलं; पण काहीनी आमच्यात संघर्ष पेटवून स्वत:ची पोळी भाजून घेतली. मात्र, यापुढे असं होऊ देणार नाही. मोहिते-भोसले परिवार एकदिलाने काम करेल. ’डॉ. अतुल भोसले म्हणाले, ‘नेहमीच मदनराव मोहिते यांचा आदर करीत आलो आहे. यापुढे त्यांच्या मार्गदर्शनाखाली चुका सुधारून वाटचाल करणार आहे. आता आम्ही मनात काहीही न ठेवता एक झालोय. त्याप्रमाणे कार्यकर्त्यांनीही जुन्या काही गोष्टी विसरून कामाला लागावे. (प्रतिनिधी)यादवांचा काटा यांनीच काढलानानांना एकमेकांवर कुरघोड्या करण्याची खूप आवड. कऱ्हाड पालिका निवडणुकीत बाबांनी नानांना जरा बाजूला ठेवले. त्याचा राग मनात धरून यांनी राजेंद्र यादव यांचा काटा काढला. जयवंत पाटील यांना हा काटा लागता-लागता राहिला. नाही तर त्यांचीही विकेट त्यांनी घेतली असती. नानांच्या या उचापतीमुळे १६ नगरसेवक निवडून येऊनही बाबांच्या बंगल्याकडे फक्त एक नगरसेविकाच फिरकली. दुसऱ्यांच्या कुबड्यांवर आमदार होता येत नाही...‘भोसले-उंडाळकर मैत्रिपर्वाची खिल्ली उडविताना आमदार व्हायचं असेल तर दुसऱ्यांच्या कुबड्यांवर होता येत नाही. आमदार होण्यासाठी स्वत:ची ताकद वाढवा, असं मी अतुलला पटवून सांगितलं. त्याला ते पटलेलं दिसतंय. म्हणून त्याने कुबड्या झुगारून दिल्या आहेत. आम्ही एकदा गाडलेलं भूत तुम्ही पुन्हा उकरून काढू नका,’ असे मदनराव मोहिते यांनी म्हणताच उपस्थितांमध्ये हशा पिकला.