शहरं
Join us  
Trending Stories
1
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
2
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
3
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
4
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
5
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
6
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
7
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
8
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
9
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...
10
“आता राज्य सरकारने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेण्यास चालढकल करू नये”: जयंत पाटील
11
कानड्यांनो, बापाला सॉरी म्हणायला लावता राव?; अवधूतने सोनू निगमची बाजू घेत लिहिली कविता
12
भारत-पाकिस्तानमध्ये झालेली युद्धं किती दिवस चालली? एवढ्या दिवसांत उडाला होता पाकिस्तानचा फज्जा
13
जादू की झप्पी! रुग्णांना बरं करणारी 'हग थेरपी' आहे तरी काय?, फायदे ऐकून तुम्हीही माराल मिठी
14
Amazon Prime सबस्क्रिप्शनसाठी पैसे खर्च करू नका; Jio, Airtel आणि Vi च्या रिचार्जवर मोफत मिळतंय
15
Nashik: जाधव बंधू हत्येनंतर ठाण्यात आला अन् ओळख लपवून राहू लागला, अखेर पोलिसांना सापडलाच
16
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
17
सूत जुळलं! ३ मुलांची आई असलेली हॉटेलची मालकीण १९ वर्षीय मजुराच्या पडली प्रेमात अन्...
18
"पहलगाम हल्ल्याच्या तीन दिवस आधी पंतप्रधान मोदींना पाठवला होता गुप्तचर अहवाल"; मल्लिकार्जुन खरगेंचा मोठा दावा
19
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
20
बाजार पुन्हा घसरला! बँक ऑफ बडोदाला मोठा धक्का; 'या' सेक्टरमधील शेअर्सही विखुरले

‘फ्लेक्स’वर झळकणार थकबाकीदारांची नावं !

By admin | Updated: December 4, 2014 00:45 IST

खटाव तालुका : धडक मोहीम सुरू; पंचायत समितीची १२ पथके तयार

पुसेगाव : खटाव तालुक्यातील ग्रामपंचायतींच्या थकीत कर वसुलीसाठी वडूज पंचायत समितीने बारा करवसुली पथके तयार केली आहेत. त्याबाबत धडक मोहीम उघडण्यात आली असल्याची माहिती गटविकास अधिकारी राहुल देसाई व भागविस्तार अधिकारी बी.बी. भोसले यांनी दिली. दरम्यान, संबंधित खातेदाराने वेळीच भरणा न केल्यास डिजीटल फ्लेक्स बोर्डवर त्या थकीत बाकीदारांची नावे झळकविण्यात येणार आहेत.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपमुख्यकार्यकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली खटाव तालुक्यात वसुलीची जोरदार मोहीम सुरू झाली आहे. या मोहिमेंतर्गत तालुक्यात एका पथकात पाच ग्रामसेवक व ग्रामविस्तार अधिकारी यांचा समावेश असलेली बारा पथके तयार करण्यात आली आहेत. संबंधित गावातील थकीत खातेदारांच्या याद्या तयार करून ग्रामपंचायतीच्या कार्यालयात नोटीस बोर्डावर प्रसिध्द करण्यात येणार आहेत. यबाबत संबंधित खातेदाराने वेळीच भरणा न केल्यास वर्दळीच्या ठिकाणी, गावातील चौकात, तसेच रहदारीच्या रस्त्यावर डिजीटल फ्लेक्स बोर्डवर त्या थकीत बाकीदारांची नावे झळकवण्यात येणार आहेत. तसेच या नागरिकांना ग्रामपंचायतीकडून देण्यात येणारी प्रत्येक सुविधा नाकारण्यात येणार आहे. त्याचबरोबर संबंधितांना देण्यात आलेली नळ कनेक्शन तोडण्यात येणार आहेत. पहिल्या टप्यात त्या नागरिकांना कर मागणी बील, दोन महिन्यांनी रीट बील व त्यानंतर शेवटचा टप्पा म्हणजे जप्ती आदेश देण्यात येणार आहे. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम १२९ नुसार करवसुलीची ही धडक मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचा ठराव प्रत्येक गावच्या ग्रामसभेत करण्यात आला आहे. तालुक्यातील मोजक्याच असलेल्या मोठ्या लोकसंख्येच्या गावात लाखो रूपयांची ग्रामपंचायत कराची रक्कम थकीत आहे. पुसेगाव, ता. खटाव येथील ग्रामपंचायतीच्यावतीने गत वर्षापासून या मोहीमेला गती मिळाली आहे. गेले वर्षभर दोन कामगार या करवसुलीच्या मोहीमेवर काम करत आहेत. संबंधित व्यक्तीच्या घरी जाऊन त्याला थकीत रक्कम भरण्यास विनवणी करत आहेत. योग्य प्रतिसाद न मिळाल्याने ग्रामसभेत ठराव करून संबंधित खातेदारांच्या याद्या ग्रामपंचायत कार्यालयात लावण्यात आल्या आहेत. फिरत्या रिक्षाद्वारे लोकांच्यात जनजागृती करण्यात येत आहे. संबंधितांनी अजूनही योग्य प्रतिसाद न दिल्यास कायद्याच्या चाकोरीतून कर वसूल करण्यात येणार आहे. थकीत खातेदारांच्या नावाच्या याद्या ग्रामपंचायत सदस्याकडे सादर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार ते सदस्य आपापल्या वार्डात नागरिकांनी त्वरित ग्रामपंचायतीचा कर भरण्यासाठी लोकांची मानसिकता तयार करत आहेत. संबंधितांना ग्रामपंचायतीकडून पुरवण्यात येणाऱ्या सुविधा पूर्णपणे थांबविण्यात येणार आहेत. नागरिकांनी कराचा भरणा न केल्याने ग्रामपंचायतीच्याकडून होणाऱ्या अंतिम कारवाईची कटूता टाळण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (वार्ताहर)