शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

म्युझिक थेरपी देतीये लढण्याचे बळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 16:32 IST

चंद्रकांत सणस म्हणाले, ‘गावात दोन ठिकाणी कर्णे लावण्यात आले आहेत. रोज सकाळी ७ ते ९ या वेळेत भक्तिगीते लावण्यात येतात. ग्रामस्थांची सकाळ सकारात्मक ऊर्जेने सुरू व्हावी, हा त्या मागचा उद्देश आहे. लॉकडाऊन काळात शारीरिक अंतर पाळून सलग तीन महिने घरांतच राहिलेल्या ग्रामस्थांना असं परस्परांपासून दूर राहणं आता

ठळक मुद्देजकातवाडीत प्रयोग : कोरोना रुग्ण सापडल्यानंतर ग्राम पंचायतीचा उपक्रमपहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर

प्रगती जाधव-पाटील ।सातारा : गावात कोरोना रुग्ण आढळल्यानंतर ग्रामस्थांच्या मनावर असलेला ताण आणि घरातच राहून आलेली मरगळ दूर करण्यासाठी जकातवाडी ग्रामपंचायतीने म्युझिक थेरपी सुरू केली आहे. रोज सकाळी दोन तास स्फूर्ती देणारी भक्तिगीते लावून ग्रामस्थांच्यात चैतन्याचं वातावरण तयार करण्याचा ग्राम पंचायतीचा हा उपक्रम स्तुत्य आहे.

जकातवाडी गावात गत सप्ताहात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण सापडल्यानंतर गावातील वातावरण गढूळ झाले होते. गावात सर्वांकडे जाऊन प्रबोधन करणं कोरोना काळात शक्य नसल्याने ग्रामस्थ समता जीवन यांनी म्युझिक थेरपीची संकल्पना ग्रामपंचायतीला सुचवली. त्यानुसार दुसऱ्याच दिवशी ग्रामपंचायत सदस्यांनी अंमलबजावणी करून हा उपक्रम सुरू केला.

याविषयी बोलताना चंद्रकांत सणस म्हणाले, ‘गावात दोन ठिकाणी कर्णे लावण्यात आले आहेत. रोज सकाळी ७ ते ९ या वेळेत भक्तिगीते लावण्यात येतात. ग्रामस्थांची सकाळ सकारात्मक ऊर्जेने सुरू व्हावी, हा त्या मागचा उद्देश आहे.

लॉकडाऊन काळात शारीरिक अंतर पाळून सलग तीन महिने घरांतच राहिलेल्या ग्रामस्थांना असं परस्परांपासून दूर राहणं आता बोचायला लागलंय. कायम घरात राहून निर्माण होणारी नकारात्मक घालवेल, अशाच गाण्यांची निवड केली आहे.’उपक्रमासाठी सरपंच चंद्रकांत सणस यांना राजेश भोसले, योगेश शिंदे, सचिन जाधव, अमोल कांबळे, अनिल कांबळे यांची साथ लाभली.

ऊर्जा देणाऱ्या गाण्यांचीच होतेय निवडमानसिक, शारीरिक आणि अध्यात्मिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी म्युझिक थेरपी उपयुक्त असल्याचे सिद्ध झाले आहे. कोरोनामुळे ग्रामस्थांमध्ये आलेली मरगळ दूर करण्यासाठी गाण्यांची सुयोग्य निवड करण्याची जबाबदारी उत्तम भोसले यांच्याकडे दिली आहे. रोज सकाळी ७ ते ९ यावेळेत गीते लावण्याचे काम महेश मोहिते करत आहे.

 

रोज सकाळी गाण्यांची मिळणारी ही मेजवानी दिवसाच्या चांगल्या सुरुवातीसाठी खूपच गरजेची आहे. या गीतांमुळे भविष्याविषयी सकारात्मकता निर्माण करण्याची अनोखी ऊर्जा मिळतेय.- समता जीवन, सहायक प्राध्यापक, जकातवाडी

 

कोव्हिडचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर ग्रामस्थ हादरून गेले होते. सार्वजनिक आयुष्याची सवय असलेल्या ग्रामस्थांना घरात राहणंही जिकिरीचं आहे. या प्रयोगाचं अनेक स्तरांतून कौतुक होतंय.- चंद्रकांत सणस, सरपंच, जकातवाडी

टॅग्स :Satara areaसातारा परिसरcorona virusकोरोना वायरस बातम्या