शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांच्या बारामतीतील प्रचाराच्या सांगता सभेत अचानक अजितदादांची एंट्री; नेमकं काय घडलं?
2
चेन्नई सुपर किंग्सने बदलले Point Table चे चित्र; दुसऱ्या फळीच्या गोलंदाजांना घेऊन १११५ दिवसांनी जिंकले
3
"एका पठ्ठ्याने अश्रू काढले, घ्या मी पण रडतो, मला मत द्या", अजित पवारांनी केली नक्कल
4
एक ऑस्ट्रेलिया, बाकी ३ कोण याची पर्वा नाही; वर्ल्ड कप विजेत्या पॅट कमिन्सचा कॉन्फिडन्स पाहा, Video 
5
मागे रिकामे कॅरेट अन् समोर चंदनाच्या गोण्या, 'पुष्पा' स्टाईल चोरी उघडकीस, 2 कोटींचे चंदन जप्त
6
भाजपा, महायुतीच्या उमेदवारांची उमेदवारी रद्द करा, कारण...; काँग्रेसची निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार
7
श्रीराम मंदिरात गेल्यामुळे पक्षातून तीव्र विरोध; काँग्रेस नेत्या राधिका खेरा यांचा राजीनामा...
8
पक्षफुटीनंतर शरद पवारांचे 'ते' शब्द आठवून रोहित पवार गहिवरले; ढसाढसा रडताना पाहून सारेच स्तब्ध
9
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
10
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
11
'सोढी' १० दिवसांपासून बेपत्ता, आदल्या दिवशी नेमकं काय घडलं होतं? वडिलांनी केला खुलासा
12
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
13
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
14
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
15
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
16
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
17
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
18
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
19
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
20
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका

नागठाणे येथे २५ लाखांच्या खंडणीसाठी युवकाचा खून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 12:07 PM

पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी तेजस विजय जाधव (वय १७, रा. आष्टे, ता. सातारा) या युवकाचा खून केल्याची धक्कादायक घटना नागठाणे, ता. सातारा येथे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.

ठळक मुद्देनागठाणे येथे २५ लाखांच्या खंडणीसाठी युवकाचा खूनदोघे ताब्यात : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

सातारा : पंचवीस लाखांच्या खंडणीसाठी तेजस विजय जाधव (वय १७, रा. आष्टे, ता. सातारा) या युवकाचा खून केल्याची धक्कादायक घटना नागठाणे, ता. सातारा येथे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेने केली.आशिष साळुंखे, साहिल शिकलगार (दोघेही रा. नागठाणे, ता. सातारा) अशी ताब्यात घेतलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी, तेजस जाधव याला व्यायामाची आवड होती. तो नेहमीप्रमाणे ११ डिसेंबर २०१९ रोजी नागठाणे येथे व्यायामासाठी दुचाकीवरून गेला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी परत आला नाही. त्याच्या घरातल्यांनी त्याचा शोध घेतला असता तो सापडला नाही. त्यामुळे त्याचे वडील तेजस जाधव यांनी बोरगाव पोलीस ठाण्यात तेजस बेपत्ता असल्याची तक्रार नोंदविली.दरम्यान, आष्टे गावापासून जवळच तेजसची दुचाकी तो बेपत्ता झाला त्याच दिवशी सापडली होती. त्या ठिकाणी दुसऱ्या एका गाडीची चावीसुद्धा आढळून आली होती. हा सारा प्रकार वडील विजय जाधव यांनी बोरगाव पोलिसांना सांगितला होता. गत दोन महिन्यांपासून तेजसचा सर्वजण शोध घेत होते. याचवेळी एकाचा तेजसच्या वडिलांना फोन आला. ह्यतुमच्या मुलाचे २५ लाखांच्या खंडणीसाठी अपहरण केले आहे,ह्ण असे त्यांना सांगण्यात आले.

या फोनची माहिती त्यांनी बोरगाव पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी आशिष साळुंखे याला ताब्यात घेतले. मात्र, त्याच्याकडून फारसी माहिती उपलब्ध न झाल्याने त्याला सोडून देण्यात आले. दरम्यान, स्थानिक गुन्हे शाखेनेही या प्रकरणाचा तपास सुरू केला. त्यावेळी या खून प्रकरणाचा उलगडा झाला. आशिष साळुंखे आणि त्याचा मित्र साहिल शिकलगार यांना पोलिसांनी त्याब्यात घेतले आहे. दोघांकडे कसून चौकशी केल्यानंतर त्यांनी खुनाची कबुली दिली. त्यानंतर मृतदेहही दाखविला.विहिरीत मृतदेह बांधून ठेवलातेजसचा खून केल्यानंतर त्याचा मृतदेह नागठाणे येथील एका विहिरीमध्ये तळाला बांधून ठेवला. पोलिसांनी शुक्रवारी मोटार लावून पाणी बाहेर काढले. त्यानंतर तेजसचा मृतदेह विहिरीतून वर काढण्यात आला. या दोघांनी तेजसचे नेमके कसे अपहरण केले, याची कसून चौकशी पोलीस करत आहेत. 

टॅग्स :MurderखूनSatara areaसातारा परिसर