शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Satara-Local Body Election: प्रस्थापित नेतृत्वाला हादरे देणारी पालिका निवडणूक

By हणमंत पाटील | Updated: November 29, 2025 19:16 IST

स्थानिक पॅनेल, आघाड्या गुंडाळून पक्ष चिन्हाला प्राधान्य

हणमंत पाटीलसातारा : सातारा, कराड, फलटण, मलकापूरसह रहिमतपूर, म्हसवड, वाई, पाचगणी व महाबळेश्वरच्या नगरपालिकांना स्थानिक पॅनेल व आघाड्यांच्या निवडणुकीची दीर्घ परंपरा आहे. मात्र, गेल्या काही वर्षांतील ही पहिली निवडणूक होत आहे, ज्यामध्ये प्रस्थापित नेते व परंपरांना हादरे बसले आहेत. इच्छा नसताना स्थानिक पॅनेल व आघाड्यांचा गाशा गुंडाळून चिन्हावर निवडणूक लढवावी लागतेय.स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून साताऱ्याची ओळख आहे. याच जिल्ह्यातील सातारा, रहिमतपूर, फलटण व कराड नगरपालिकांना १०० हून अधिक वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे जुन्या नगरपालिकांमधून स्थानिक नेतृत्व उदयाला आले. या नेतृत्वाने नगरपालिकेच्या नगरसेवकपदापासून सुरुवात केली. पुढे आमदार, खासदार तर काहींना मंत्रिपदाची संधी मिळाली. तरीही या प्रस्थापित नेतृत्वाने नगरपालिकेवरील पकड सोडली नाही. त्यामुळे सातारा, फलटण, रहिमतपूर, पाचगणी व महाबळेश्वर येथील नगरपालिकांवर स्थानिक प्रस्थापित नेतृत्वाची छाप २५ ते ५० वर्षांपासून कायम राहिली.दरम्यान, गेल्या अनेक वर्षांतील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनंतर पहिल्यांदाच स्थानिक नेतृत्वांचा व आघाड्यांचा प्रभाव कमी झाल्याचे दिसते. ही निवडणूक स्थानिक नेतृत्वाऐवजी पक्षचिन्हांवर लढविली जात आहे. त्याला सातारा जिल्ह्यातील एकाही नगरपालिकेचा व नगरपंचायतीचा अपवाद नाही.

साताऱ्यातील ‘राजे’ही चिन्हावर लढताहेत...साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले व मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले हे कोणत्याही राजकीय पक्षात असले तरी नगरपालिका निवडणुकीत त्यांचे स्वतंत्र पॅनेल होते. मात्र, या नगरपालिका निवडणुकीत दोन्ही राजे एकत्र येऊन त्यांनी भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे.जिल्ह्यात ४०९ उमेदवार पक्षचिन्हावर...सातारा जिल्ह्यातील नऊ नगरपालिका व एका नगरपंचायतीची निवडणूक २ डिसेंबरला होत आहे. त्यामध्ये नगरसेवकपदासाठी एकूण ७२२ जण इच्छुक असून, त्यापैकी सुमारे ४०९ जण पक्ष चिन्हांवर निवडणूक लढवित आहेत. तसेच, नगराध्यक्षपदाचे २० उमेदवारही राजकीय पक्षांच्या चिन्हावर आले आहेत.

राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हटले आहे की, “कोणतीही राजकीय व्यक्ती व पक्षाचे चिन्ह मोठे होण्यापेक्षा देश मोठा व्हावा. राजकीय पक्षाचे मत राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ मानले, तर भारतीय स्वातंत्र्य दुसऱ्यांदा धोक्यात येईल. कदाचित ते कायमचे नष्ट होईल. त्यामुळे शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत देशाचे हित श्रेष्ठ मानले पाहिजे,” या डॉ. आंबेडकर यांच्या विधानाची आज प्रकर्षाने जाणीव होते. अलीकडच्या काळात पक्षचिन्हांचा प्रभाव वाढत चालला आहे. त्यामुळे संबंधित राजकीय पक्षाची विचारधारा नसतानाही अनेक उमेदवार अपरिहार्यता म्हणून पक्ष चिन्हावर नगरपालिका निवडणूक लढविताना दिसत आहेत. त्याने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मूळ हेतूला हादरे बसत आहेत. हा कोणत्याही राजकीय पक्षाच्या रणनीतीचा भाग असला तरी, तो लोकशाहीसाठी धोकादायक आहे. - डॉ. यशवंत पाटणे, ज्येष्ठ विचारवंत 

स्थानिक आघाड्या व पॅनेल संपुष्टात येऊन राजकीय पक्ष चिन्हावर नगरपालिका निवडणूक आली. याचे फायदे आणि तोटे दोन्हीही आहेत. कारण पक्ष चिन्ह असल्याने प्रस्थापित नेतृत्वाला हादरे बसले; पण, नवीन नेतृत्वाचा उदय होण्यास अटकाव होईल. तसेच, एखाद्या पक्षाचा प्रभाव वाढल्यास एकाधिकारशाही व हुकूमशाहीचा प्रभाव वाढत जाईल. परंतु, पक्षचिन्हावरील निवडणुकीमुळे अपक्ष उमेदवारांच्या घोडेबाजाराला अटकाव होईल. - राजेंद्र चोरगे, संस्थापक, बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट

English
हिंदी सारांश
Web Title : Satara Local Body Elections Shake Established Leadership, Shift to Party Symbols

Web Summary : Satara's local body elections see a shift from local panels to party symbols, impacting established leaders. Party symbols dominate, sidelining independent candidates, raising concerns about democracy.