शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

मोघल सरदार रणदुल्ला खानाचे ‘रणदुल्लाबाद’

By admin | Updated: March 22, 2015 00:14 IST

सोळाव्या शतकातील साक्षीदार: ऐतिहासिक परंपरेसह धार्मिक सलोखा जपणारे गाव

कमलाकर खराडे, पिंपोडे बुद्रुक : हरेश्वराच्या डोंगरापासून चवणेश्वर डोंगर रांगेतील मध्यावर डोंगर पायथ्याला रणदुल्लाबाद हे गाव वसलेले आहे. या गावाला ऐतिहासिक पार्श्वभूमी असून, अफजल खानाच्या स्वराज्यावरील मोहिमेचे साक्षीदार असलेले हे गाव आहे. अफजल खानासोबत रणदुल्ला खान हा दुसरा सरदारही होता. तो शिवरायांचा समर्थक म्हणून ओळखला जात होता. त्यामुळे अफजल खानाने त्याला संपवून याठिकाणी त्याची कबर बांधली. तेव्हापासून या गावाला रणदुल्लाबाद नाव मिळाले. सोळाव्या शतकात अफजल खानाने स्वराज्यावर केलेल्या आक्रमणावेळी हे गाव अस्तित्वात नव्हते. स्वराज्य रक्षणासाठी शिवाजी महाराजांच्या मावळ्यांनी अफजल खानाच्या सैन्याचा या ठिकाणी सामना केला. त्यावेळी माहूर, ता. पुरंदर येथील जगताप बंधू अन् वाईचे पिसाळ-देशमुख या मराठा शिलेदारांवर शिवाजी महाराजांनी जबाबदारी दिली होती. लढाईनंतर जगताप अन् पिसाळ-देशमुखांनी या ठिकाणी वास्तव्य केले. यातूनच ‘रणदुल्लाबाद’ गाव वसले. या गावात जगतापांची घरे अधिक आहेत. छत्रपतींचा समूळ नायनाट करण्यासाठी आदिलशाहीने अफझल खानावर मोठी जबाबदारी दिली होती. अफजल खानाबरोबर रणदुल्ला खान हा दुसरा सरदारही या मोहिमेत सहभागी होता. मात्र, तो शिवाजी महाराज समर्थक म्हणून ओळखला जात होता. आदिलशाहाच्या दरबारात छत्रपती शहाजीराजे यांच्याबरोबर रणदुल्ला खान होता. या दोघांमधील मैत्री आदिलशाहीसाठी डोकेदुखी होती. त्यामुळे रणदुल्ला खान या मोहिमेविषयी नाराज होते. हरेश्वर डोंगररांगेजवळ खानाची छावणी पडली होती. त्यावेळी ज्या छावणीत अन् जगताप-देशमुख या राजांच्या सैन्यात युद्ध झाले होते. याच ठिकाणी अफजल खानाने त्यांच्यावर विष प्रयोग करून रणदुल्ला खानला संपवून त्याची कबर बांधली. त्यानंतर अफजल खानाने पुढे वाईच्या दिशेने प्रयाण केले. मात्र माहूरचे जगताप आणि वाईचे पिसाळ-देशमुख यांनी येथेच वास्तव्य केले. रणदुल्ला खान यांच्या कबरीमुळे या गावाला ‘रणदुल्लाबाद’ नाव पडले असल्याचे ज्येष्ठ सांगतात. रणदुल्लाबाद येथे एकच मुस्लीम कुटुंब राहते. मात्र गावाचा सामाजिक व धार्मिक सलोखा निश्चितपणे वाखाण्ययाजोगा आहे. गावात एकही कूपनलिका नाही गावात हिंदू-मुस्लीम ऐक्य असून, मोहरम आणि ईद साजरी केली जाते. गावची लोकसंख्या सुमारे अडीच हजार आहे. पंधरा वर्षांत पाणलोट विकास कार्यक्रम राबवून गावाने उत्तर कोरेगाव तालुक्यात आदर्श निर्माण केला आहे. वीस वर्षांपासून गावात कूपनलिकांवर बंदी आहे. त्यामुळे एकही वैयक्तिक कूपनलिका नाही. याबाबत अशी बंदी घालणारे रणदुल्लाबाद हे जिल्ह्यातील एकमेव गाव आहे. रणदुल्ला खानाची गावात कबर रणदुल्लाबाद गावात मोघल सरदार रणदुल्ला खानाची कबर आहे. अफजल खानाने स्वराज्यावर स्वारी केली तेव्हा खानाबरोबर रणदुल्ला खानही होता. शिवाजी महाराज यांचा समर्थक असल्याचा संशय आल्यामुळे अफजल खानाने रणदुल्ला खानाला मारले आणि त्याची कबर बांधली.