शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

Mucormycosis: म्युकरमायकोसिस झालं आता पोटदुखीच्या अ‍ॅटॅकचं दुखणं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 20:18 IST

Mucormycosis: कोरोना विषाणू फुफ्फुसांवर हल्ला करतो हे सर्वज्ञात आहे. कोविडच्या दुसऱ्या स्टेनमध्ये विविध अवयवांवर हल्ला करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतड्याचा रक्तपुरवठा करणाºया रक्तवाहिन्या बंद झाल्याने जिल्ह्यात अनेक रूग्णांना पोटदुखीचा अ‍ॅटॅक येत आहे. प्रचंड वेदनादायी असलेला ही पोस्ट कोविड पोटदुखी अनेकांच्या त्रासाचे कारण बनु लागली आहे.

ठळक मुद्देपोस्ट कोविडची पोटदुखी रक्ती जुलाब रूग्णांची संख्या वाढली; काळजी घेण्याची गरज

प्रगती जाधव-पाटीलसातारा : कोरोना विषाणू फुफ्फुसांवर हल्ला करतो हे सर्वज्ञात आहे. कोविडच्या दुसऱ्या स्टेनमध्ये विविध अवयवांवर हल्ला करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतड्याचा रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्या बंद झाल्याने जिल्ह्यात अनेक रूग्णांना पोटदुखीचा अ‍ॅटॅक येत आहे. प्रचंड वेदनादायी असलेला ही पोस्ट कोविड पोटदुखी अनेकांच्या त्रासाचे कारण बनु लागली आहे.जिल्ह्यात कोरोना रूग्णांची संख्या कमी झाली असली तरीही पोस्ट कोविड दुखणं बळावू लागलं आहे. पुरेशी काळजी आणि योग्य उपचार या दोन्हीमुळे हा त्रास कमी होऊ शकतो असं वैद्यकीयतज्ज्ञ सांगतात. शास्त्रीय भाषेत या दुखण्याला मायक्रो एम्बोलिझम म्हटले जाते. कोविडमधून बरे झालेल्या रूग्णांना म्युकरमायकोसिसनंतर आता या पोटदुखीने ग्रासले असून अनेक रूग्ण यावर उपचार घेत आहेत.किरकोळ स्वरूपातील पोटदुखीकडे दुर्लक्ष केलं तर पुढे शौचातून रक्त पडायला सुरूवात होते. हा या आजाराचा दुसरा टप्पा मानला जातो. आतड्याला रक्तपुरवठा करणाऱ्या वाहिन्या बंद झाल्याने शौचाच्या आतड्यात अंतर्गत रक्तस्त्राव होतो. हे रक्त शौचात आढळल्यानंतर घाबरून न जाता तातडीने तज्ज्ञांकडून उपचार घेणे महत्वाचे आहे. ४५ वर्षांच्या आतील वयोगटात हा आजार आढळून येत असल्याने पुरेशी काळजी घेणं आवश्यक असल्याचे तज्ज्ञ सांगतात.आतड्यात होतंय गँगरीन!पोटदुखीकडे दुर्लक्ष केल्यानंतर शौचातून रक्त पडण्याचा त्रास होतो. अनेकदा हे मुळव्याधीमुळे होत असल्याने त्या पध्दतीने औषधोपचार केले जातात. आतड्यांना रक्तपुरवठा होत नसल्याने आतडे काळेपडून त्यावर छिद्र पडल्याचेही काही रूग्णांमध्ये आढळून आले आहे. हे गँगरीनसारखे असल्याचे आढळून येते.ही काळजी घ्यापावसाच्या दिवसांत पचनसंस्था संथ झालेली असते. कोविडमधून बरे झालेल्यांनी पचायला हलका आणि सात्विक आहार घ्यायला प्राधान्य द्यावे. या दिवसांत बाहेरी अन्नपदार्थ आणि पाणी पिणं टाळावं. पाण्याची पातळी राखण्यासाठी नियमीत किमान चार लिटर पाणी पिल्याने शरिरातील विषाणूंचा शरिरातील लोड कमी होतो.यासाठी तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घ्या

  • तिव्र पोटदुखी
  • जुलाब
  • उलटी
  • शौचातून रक्त पडणं
  • ताप येणं
  • पोट फुगणं
  • बेशुध्द होणं

 

पावसाळ्याची सुरूवात झाल्यानंतर खाण्यात वेगळं आलं म्हणून पोटदुखीकडे कानाडोळा करण्यात येतो. याचा परिणाम आतड्यांवरही होऊ लागला आहे. किरकोळ स्वरूपात दुखणं असलं तरीही तज्ज्ञांकडे जाऊन त्याची चिकित्सा करणं गरजेचं बनलं आहे. पहिल्या टप्प्यात यावर उपचार विनासायास करणं सहज शक्य आहे.- डॉ. संदीप श्रोत्री,पोटविकारतज्ज्ञ, सातारा

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसSatara areaसातारा परिसर