शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

..तर लोकप्रतिनिधीही नसता, उदयनराजेंचे शिवेंद्रसिंहराजेंवर टीकास्त्र

By सचिन काकडे | Updated: September 7, 2022 18:03 IST

'तुम्हाला जे काही मिळाले आहे ते पहिल्यापासून ऐतं व काम न करता मिळालं'

सातारा : 'तुम्हाला जे काही मिळाले आहे ते पहिल्यापासून ऐतं व काम न करता मिळालं आहे. जर सर्वसामान्य कुटुंबातील असता तर तुम्हाला लोकप्रतिनिधी देखील होता आलं नसतं,' अशा शब्दात खासदार उदयनराजे भोसले यांनी आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यावर टीकास्त्र सोडले.सातारा नगरपालिकेच्या नूतन प्रशासकीय इमारतीसाठी जिल्हा परिषदेसमोरील मोकळ्या जागेत सुरू असलेल्या कामाची खासदार उदयनराजे यांनी आज, बुधवारी दुपारी पाहणी केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना आमदार शिवेंद्रसिंहराजेंवर नाव न घेता सडकून टीका केली.उदयनराजे म्हणाले, पूर्वीच्या लोकांनी चोऱ्यामाऱ्या केल्या, भ्रष्टाचार केला, डांबर चोरलं त्यामुळे आम्ही तुमच्या हातात सत्ता दिली आणि तुम्ही पण तसेच निघालात. बोलणं सोपं असतं पण करणं फार अवघड असतं. पोवई नाक्यावर ग्रेट सेपरेटर (भुयारी मार्ग) बांधताना इथे स्विमिंग पूल बांधणार की काय? अशी टीका आमच्यावर केली. अहो, जर इथे उड्डाणपूल बांधला असता आणि चुकून एखादे वाहन खाली कोसळले असते तर किती मोठी घटना घडली असती? ही बाब त्यांना समजू नये का. सर्व परिस्थितीचा आढावा घेऊनच ग्रेड सेपरेटरचे बांधकाम करण्यात आले.बांधकाम झाल्यानंतर याचे उद्घाटन आम्ही करणार असं ते म्हणाले. मी म्हणतो, उद्घाटन घ्यायचं होतं ना. असंही तुम्हाला सर्व काही ऐतं व काम न करताच मिळालेले आहे.  तेव्हा घराण्यामुळे वीस वर्षे सत्ता यांच्याच हातात होती. हे जर सर्वसामान्य कुटुंबातील असते तर मला नाही वाटत ते कधी लोकप्रतिनिधी झाले असते.नूतन प्रशासकीय इमारत नऊ मजलीसातारा शहराची हद्दवाढ झाली असून, नगरपालिकेची सध्याची इमारत कामकाजासाठी अपुरी पडत आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेसमोरील दीड लाख स्क्वेअर फुट जागेत पालिकेची नूतन व सुसज्ज अशी नऊ मजली प्रशासकीय इमारत बांधली जात आहे. या इमारतीमधून निश्चितच शहराचे कामकाज अधिक प्रभावीपणे चालविले जाईल, असेही खा. उदयनराजे म्हणाले. यावेळी माजी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, माजी शिक्षण सभापती सुनील काटकर आदी उपस्थित होते.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले