शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

विरोधी उमेदवारानंतरच हालचाली ! राष्ट्रवादी आमदारांची भूमिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2019 23:51 IST

 प्रगती जाधव-पाटील । सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र, अद्यापही विरोधी उमेदवाराचे नाव ...

ठळक मुद्देपुढील आठवड्यात बैठकांचे नियोजन

 प्रगती जाधव-पाटील ।सातारा : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने उदयनराजे भोसले यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र, अद्यापही विरोधी उमेदवाराचे नाव पुढे न आल्यामुळे राष्ट्रवादी आमदारांच्या गोटात तुलनेने शांतता आहे. समोर येणारा उमेदवार कोणत्या पक्षाचा आहे, यावर आमदार पुढील रणनीती ठरवणार असल्याचं चित्र दिसत आहे.

सातारा लोकसभा मतदार संघात यावेळी अनेक हाय व्हॉल्टेज घटना घडल्या. उदयनराजेंना विरोध करण्यासाठी थेट पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्यापर्यंत आमदार धडकले होते; पण सातारा जिल्ह्यात अद्यापही आपलाच शब्द प्रमाण मानला जात असल्याचे पवारांनी यानिमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध केले. पुण्यातील बैठकीत त्यांनी सर्वांना ‘नांदा सौख्यभरे’ सांगून कामाला लागण्याचा आदेश दिला.

सातारा लोकसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची संख्या मोठी आहे. पुण्यातील बैठकीनंतर उदयनराजे यांचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले. त्यांच्या वॉररूममध्ये निवडणुकीचं वारं घोंघावत असताना अन्य तालुक्यांमध्ये तुलनेने शांतता दिसत आहे. कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या व्यतिरिक्त कोणीही कार्यकर्त्यांची बैठक न लावल्याने कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता दिसत होती. दरम्यान, गुरुवारी उदयनराजे समर्थकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यात सर्वपक्षीय कार्यकर्ते उदयनराजे समर्थक म्हणून सहभागीही झाले; पण त्यात राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांची उपस्थिती नगण्य अशीच होती.

राष्ट्रवादीचे उदयनराजे भोसले यांच्या विरोधात युतीचा कोणता उमेदवार उभा राहणार? याविषयीचे चित्र अद्यापही स्पष्ट नाही. हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीकडे जातो की शिवसेनेकडे, यावर राष्ट्रवादीची पुढील रणनीती ठरणार आहे. भाजपाकडून माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांना तर शिवसेनेकडून पुरुषोत्तम जाधव यांना उमेदवारीचे संकेत मिळत आहेत. वाईचे आमदार मकरंद पाटील, कºहाड उत्तरचे आमदार बाळासाहेब पाटील आणि साताऱ्याचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी पुढील सप्ताहात या बैठकीचे आयोजन करण्याचे नियोजित केले आहे; पण याचं निश्चित नियोजन प्रतिस्पर्धी उमेदवार ठरल्यानंतरच होणार आहे.

भाजपाच्या भावी आमदारांची रंगीत तालीम असल्याचे मानले जात आहे. त्यादृष्टीने भाजपेचे नेते मंडळी कामाला लागले आहेत. भारतीय जनता पार्टीच्या स्थानिक नेते आमदारकीसाठी गेल्या वर्षभरापासून कामाला लागले आहेत. ते प्रतिस्पर्धी पक्षाच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघ जर भारतीय जनता पार्टीकडे गेला तर येथे राष्ट्रवादीला जास्तीची ताकद लावावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवारासाठी काम करून तालुका पातळीवर शड्डू ठोकून असलेल्या भावी आमदारांची या निमित्ताने रंगीत तालीम होणार आहे. तशीच ही लढत रंगणार आहे. 

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुनील माने यांच्याशी बोलून पुढील सप्ताहात पदाधिकारी व नेत्यांची उपलब्धता तपासून आम्ही तालुक्यातील बैठकांचे आयोजन करणार आहोत. मी परगावी असल्याने याविषयी लवकरच कार्यकर्त्यांनाही माहिती देणार आहे.- शिवेंद्रसिंहराजे भोसले, आमदार

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर