ग्रामपंचायत सदस्य अमित प्रकाश पाटील, नानासाहेब मारुती चव्हाण, रघुनाथ मारुती खरात, दत्तात्रय शंकर काशिद, शोभा भरत चव्हाण, अंजली युवराज चव्हाण, वंदना संजय लोहार यांच्यावतीने याबाबतचे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोपर्डे हवेली हे विभागातील महत्त्वाचे आणि जास्त लोकसंख्या असलेले गाव आहे. गावातील प्रमुख रस्त्यांवर यापूर्वी पथदिवे बसविण्यात आले आहेत. मात्र, हे पथदिवे सध्या बंद स्थितीत आहेत. नवीन पथदिवे बसविण्याबाबत यापूर्वी वारंवार सरपंच व ग्रामसेवकांकडे मागणी करण्यात आली. मात्र, त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. सध्या गावात ठिकठिकाणी रस्त्यासह गटरांची बांधकामे सुरू आहेत. त्यासाठी बांधकामाचे साहित्य रस्त्यानजीक टाकण्यात आले आहे. तर काही ठिकाणी खोदकाम करण्यात आले आहे. रस्त्यावरील पथदिवे बंद असल्यामुळे रात्रीच्यावेळी हा अडथळा ग्रामस्थांच्या निदर्शनास येत नाही. परिणामी, अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ग्रामपंचायतीने नवीन पथदिवे बसवावेत. याबाबतची कार्यवाही किती दिवसांत करणार, हे ग्रामसेवक व सरपंचांनी दोन दिवसात सांगावे. अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला असून या आंदोलनास ग्रामसेवक व सरपंच जबाबदार असतील, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर नमूद सात ग्रामपंचायत सदस्यांच्या सह्या आहेत.
फोटो : ०७केआरडी०१
कॅप्शन : कोपर्डे हवेली (ता. कऱ्हाड) येथे पथदिवे बसविण्याबाबत ग्रामपंचायतीला निवेदन देण्यात आले. यावेळी अमित पाटील, नानासाहेब चव्हाण, रघुनाथ खरात आदी उपस्थित होते.