शहरं
Join us  
Trending Stories
1
पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३१ हजार ६२८ कोटींचं पॅकेज जाहीर; राज्य सरकारने केली मोठी घोषणा
2
"मी सर्वात पहिले पलायन करणाऱ्या बॅचमधील...!"; मैथिली ठाकूरच्या निवडणूक लढण्यासंदर्भात वडिलांची पहिली प्रतिक्रिया, तुम्हीही भावूक व्हाल
3
"सगळेच लोक अत्यंत...!"; विरोधकांच्या 'मत चोरी'च्या आरोपांवर मैथिली ठाकुरचं मोठं विधान, स्पष्टच बोलली
4
जॉन क्लार्क, मिशेल एच. डेवोरेट आणि जॉन एम. मार्टिनिस यांना भौतिकशास्त्राचा नोबेल जाहीर
5
न्यायाधीशाची न्यायालयातच गोळ्या घालून हत्या; पिता-पुत्रही जखमी, सुनावणी सुरू असताना घडली घटना
6
Chaitanyananda Saraswati : स्वयंघोषित बाबाचं 'फाईव्ह स्टार' सीक्रेट; डीनने मुलींना दिली हॉटेलमध्ये रात्र घालवण्याची धमकी
7
VIDEO: वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात राडा! खूपच संतापला, भरमैदानात पंचांशी वाद घातला...
8
लोनवर Hero Splendor खरेदी करण्यासाठी किती डाउन पेमेंट करावं लागेल? किती लागेल मंथली EMI, जाणून घ्या
9
"सरकारने आज घोषित केलेली मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा, शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी देणार?’’, काँग्रेसचा सवाल   
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; महाराष्ट्रासह या राज्यांमध्ये चार नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
11
"शेतकऱ्यांना पंजाबपेक्षा जास्त मदत दिली, तुलना करण्यापेक्षा..."; एकनाथ शिंदेंनी विरोधकांना सुनावलं
12
इतक्या कोटींची मालकीण आहे २५ वर्षीय मैथिली ठाकूर! एका शोचे मानधन किती? बिहार निवडणुकीमुळे चर्चेत
13
“STला आर्थिकदृष्ट्या समृद्ध करणे गरजेचे, कामगारांच्या मागण्यांवर शासन सकारात्मक”: सरनाईक
14
२ वर्षांच्या मुलीवर माकडांचा हल्ला; वडिलांसमोर छतावरुन खाली पडली, धडकी भरवणारा Video
15
“शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करणार, पण आज थेट मदतीची जास्त गरज”: CM देवेंद्र फडणवीस
16
शबरीमला मंदिरातील सोन्याच्या मुलाम्यात घोटाळा? न्यायालयात मोठा खुलासा, देवस्वम बोर्डाने आरोप फेटाळले
17
१४ वर्षांच्या उच्चांकी स्तराच्या जवळ 'या' सरकारी बँकेचे शेअर्स; रेखा झुनझुनवालांनी खरेदी केले आणखी शेअर्स
18
Y Puran Kumar: वाद आणि संघर्षांनी भरलेली कारकीर्द; कोण होते वरिष्ठ आयपीएस अधिकारी वाय. पूरन?
19
अतिवृष्टीचा फटका बसलेल्या कोरडवाहू, हंगामी बागायतदार आणि बागायतदार शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी किती पैसे मिळणार?
20
UPI व्यवहारांच्या नियमामध्ये होणार बदल, ८ ऑक्टोबरपासून अशा प्रकारे करू शकाल पेमेंट

गौण खनिजासाठी डोंगर पोखरले

By admin | Updated: February 10, 2015 23:59 IST

कऱ्हाड तालुक्यातील चित्र : महसूल विभागाचे दुर्लक्ष, कारवाई करणे गरजेचे

उंडाळे : मानवाकडून स्वहितासाठी निसर्गाच्या संपत्तीचा गैरवापर केला जातो. हे आजपर्यंत ऐकले तसेच पाहिलेही असेल. मात्र आता कऱ्हाड तालुक्यात ठिकठिकाणी डोंगर पोखरले जातायत. लहान-मोठ्या टेकड्यांवर उत्खनन होत असल्याने कालांतराने या टेकड्या नामशेष होण्याची शक्यता नाकारता येत नाही.डोंगर कपारीत विविध प्रकारच्या वनस्पती आढळून येतात. त्याचबरोबर डोंगरातून माती, दगड यासारख्या खनिज संपत्तीही मिळतात. सध्या मात्र या गौणखनिजासाठी डोंगरच पोखरले जात असल्याचे दिसून येते. परिणामी, भविष्यात ‘डोंगर वाचवा’ अभियान राबविण्याची गरज निर्माण होईल. ज्यापद्धतीने ‘झाडे लावा, झाडे जगवा’ असा संदेश दिला जातो. तसाच संदेश आता पर्यावरणासह ‘डोंगर वाचवा’ यासाठीही द्यावा लागेल. ग्रामीण भागातील बहुतांश ठिकाणी डोंगर पायथ्याला गौण खनिजाचे उत्खनन प्रचंड प्रमाणात केले जाते. विटा बनविणे तसेच बांधकाम करताना भराव घालण्यासाठी हे उत्खनन केले जात आहे. तसेच मोठे दगड खडी बनविण्यासाठी वापरले जातायत. डोंगरांचे प्रमाणापेक्षा जास्त उत्खनन केले जात असल्यामुळे पर्यावरणासाठी ते घातक ठरणार आहे.मुळातच वृक्षतोड व इतर कारणांमुळे पावसाचे प्रमाण कमी झाले आहे. अशातच डोंगर पोखरण्यास सुरूवात झाल्याने भविष्यात त्याचा मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही. गौणखनिजाचे उत्खनन करणारे सध्या गबर झाले आहेत. महसुल विभागाने या गोष्टींचा विचार करून गौण खनिजाचे अवैधरीत्या उत्खनन करणाऱ्यांना चाप लावणे गरजेचे आहे. (वार्ताहर)