शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

प्रतापसिंहनगरात तलवार, काेयत्याने १५ वाहनांची तोडफोड; गुंड लल्लन जाधवसह पाच जणांचे कृत्य

By दत्ता यादव | Updated: March 20, 2024 16:11 IST

संशयित चार जण ताब्यात

सातारा : शहरालगत असलेल्या प्रतापसिंहनगरात गुंड अजय उर्फ लल्लन जाधव (वय २४, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) याने साथीदारांच्या मदतीने हातात तलवार, कोयता घेऊन तब्बल १५ हून अधिक वाहनांची तोडफोड केली. यामध्ये सुमारे दोन लाखांचे नुकसान झाले आहे. ही घटना बुधवारी रात्री दोनच्या सुमारास घडली. याप्रकरणी पोलिसांनी चाैघांना ताब्यात घेतले असून, लल्लन जाधव पसार झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, प्रतापसिंहनगरमध्ये बुधवारी रात्री अजय उर्फ लल्लन जाधव याने साथीदारांना सोबत घेऊन तलवारीने दहशत माजवली. एका व्यक्तीवर कोयत्याने वार केला. यामध्ये संबंधित व्यक्ती जखमी झाली असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संबंधितांनी रस्त्याच्याकडेला पार्क केलेली वाहने कोयत्याने फोडण्यास सुरुवात केली. या आवाजामुळे नागरिक झोपेतून उठून बाहेर आले. मात्र, हल्लेखोरांच्या हातात तलवार, कोयते असल्यामुळे त्यांना कोणीही विरोध केला नाही.

 ‘गाड्या फोड,’ असे ओरडून एकमेकांना हल्लेखोर सांगत होते. हा वाद मुलीच्या कारणावरून झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. गाड्यांची तोडफोड केल्यानंतर दहा मिनिटांत दहा हल्लेखोर तेथून पसार झाले. या प्रकाराची माहिती सातारा शहर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी धरपकड करून चाैघा संशयितांना ताब्यात घेतले. मात्र, गुंड लल्लन जाधव पसार झाला. दरम्यान, या प्रकरणामध्ये अद्यापही शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला नव्हता.