शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

व्याघ्र प्रकल्पापेक्षा जास्त बिबटे शिवारात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 16, 2021 16:43 IST

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जेवढे बिबटे वावरतायत, त्यापेक्षा जास्त संख्येत ते कऱ्हाड आणि पाटणच्या शिवारात वावरत असल्याचा निष्कर्ष प्राणी अभ्यासकांनी काढलाय.

कऱ्हाड : वन्य प्राण्यांची मोजदाद वन्यजीव विभागाच्या हद्दीत म्हणजेच राखीव क्षेत्रात होते; पण प्रादेशिक वनविभागाच्या हद्दीत अशी गणना होत नाही. किती अन् कुठे प्राणी वावरतायत, हेच या विभागाला माहिती नसतं. बिबट्याचंही असंच झालंय. प्रादेशिक वनहद्दीसह शिवारात त्यांची संख्या किती, हेच निश्चित नाही. मात्र, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात जेवढे बिबटे वावरतायत, त्यापेक्षा जास्त संख्येत ते कऱ्हाड आणि पाटणच्या शिवारात वावरत असल्याचा निष्कर्ष प्राणी अभ्यासकांनी काढलाय.प्रादेशिक वनविभागाचे क्षेत्र गावोगावी डोंगररांगांमध्ये विखुरले गेले आहे. त्यामुळे या क्षेत्रात वावरणाऱ्या प्राण्यांचा मागमूस काढणे कठीण. मात्र, प्राण्यांची जेवढी विविधता सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात आढळून येते, त्याचपटीत कमी-जास्त प्रमाणात वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी डोंगररांगांमध्ये वावरत असल्याचे प्राणी अभ्यासकांचे मत आहे. कऱ्हाड व पाटण तालुक्यांतील वाढत्या बिबट्याप्रवण क्षेत्राचा विचार करता प्रादेशिक हद्दीत सह्याद्री व्याघ्र प्रकल्पांपेक्षा जास्त बिबटे वावरत असल्याचे मानद वन्यजीवरक्षक रोहन भाटे यांनी सांगितले.दरम्यान, मध्यंतरी करण्यात आलेल्या सर्वेक्षणात कऱ्हाड आणि पाटण तालुक्यांच्या प्रादेशिक वनहद्दीत सुमारे १०० बिबट्यांचा वावर असल्याचे समोर आले होते, असे वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे सदस्य आणि प्राणी अभ्यासक नाना खामकर यांनी सांगितले.

प्रादेशिक वनविभागाचे क्षेत्र१२,५८५.५७ : राखीव क्षेत्र१४.६५ : अवर्गित क्षेत्र५५३.६७ : संपादित क्षेत्र०.० : संरक्षित क्षेत्र१३१५३.७९ : एकूण क्षेत्र(क्षेत्र हेक्टरमध्ये)

कऱ्हाडचे बिबट्याप्रवण क्षेत्रमलकापूर : ७७०.०४नांदगाव : ७२८.१९कोळे : १०३९.४२कासारशिरंबे : ५८५.११०तांबवे : ९००.९२म्हासोली : ८३२.५२वराडे : १२८४.४००म्होप्रे : ९१६.१८०(आकडेवारी हेक्टरमध्ये)२५३ जनावरांची शिकार२०१३-१४ : २०२०१४-१५ : १६२०१५-१६ : ३४२०१६-१७ : ४४२०१७-१८ : ७९२०१८-१९ : ४४२०१९-२० : ४८२०२०-२१ : ४०एकुण २५३४४ : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील बिबट्यांची संख्या

उपाशी बिबट्यांचा धोका अधिकबिबट्या उपाशी असेल तर तो अधिक हिंस्र बनतो, असे प्राणीतज्ज्ञ सांगतात. भक्ष्याच्या शोधात तो फिरत असतो. मात्र, भक्ष्य नाही मिळाले तर मानवी वस्तीनजीक पाळीव जनावरांवर तो हल्ला चढवतो. दोन ते तीन दिवसांत एकदाच तो शिकार करतो, असेही प्राणीतज्ज्ञांचे मत आहे.

जंगल हा अधिवासच बिबट्या विसरला असून, उसाचे शेत हेच जंगल असल्याचा अनुवंशिक बदल त्यांच्यामध्ये झाल्याचे दिसून येते. प्रादेशिक वनहद्दीत म्हणजेच कोयना आणि चांदोली अभयारण्य वगळता कऱ्हाड, पाटण तालुक्यांतील इतर प्रदेशांत शंभरापेक्षा जास्त बिबटे असावेत. - नाना खामकर, सदस्य, वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरो

बिबट्याप्रवण क्षेत्र कमालीचे वाढले आहे. वारंवार हल्लेही होत आहेत. हा प्राणी २४ तासांत सुमारे चौदा चौरस किलोमीटर क्षेत्रात फिरतो. सध्याचे बीटनिहाय बिबट्याप्रवण क्षेत्र पाहता प्रत्येक बीटमध्ये किमान दोन ते तीन बिबटे असावेत. आणि त्यांची एकूण संख्या ‘सह्याद्री’तील संख्येपेक्षा जास्त असावी.  - रोहन भाटे, मानद वन्यजीव रक्षक

टॅग्स :Satara areaसातारा परिसरleopardबिबट्या