शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

रहिमतपूर परिसरात पंधरा दिवसात दीडशेहून अधिक बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 12:09 IST

CoronaVirus satara : रहिमतपूर शहरासह परिसरातील गावात गेल्या पंधरा दिवसांत सुमारे दीडशेच्या पुढे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. एकट्या रहिमतपुरात शंभरहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. रहिमतपुरात कोरोना सेंटर उभारण्यात यावे अशी मागणी होत आहे. पालकमंत्र्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय का? याकडे लक्ष लागले आहे.

ठळक मुद्देरहिमतपूर परिसरात पंधरा दिवसात दीडशेहून अधिक बाधित कोरोना सेंटरची गरज : पालकमंत्र्यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष

रहिमतपूर : रहिमतपूर शहरासह परिसरातील गावात गेल्या पंधरा दिवसांत सुमारे दीडशेच्या पुढे कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. एकट्या रहिमतपुरात शंभरहून अधिक रुग्ण उपचार घेत आहेत. रहिमतपुरात कोरोना सेंटर उभारण्यात यावे अशी मागणी होत आहे. पालकमंत्र्याकडून सकारात्मक प्रतिसाद मिळतोय का? याकडे लक्ष लागले आहे.रहिमतपूरची लोकसंख्या सुमारे बावीस हजार आहे. तर परिसरातील वाठार किरोली, साप, अपशिंगे, पिंपरी आदी मोठ्या गावांसह लहान गावे व वाड्यावस्त्यामधील कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी दर्जेदार यंत्रणा उपलब्ध असणे गरजेचे आहे. काही दिवसांपासून रहिमतपूर येथे विलगीकरण कक्ष उभारण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. परंतु अद्याप उभारणी झालेली नाही. परंतु रुग्ण वाढीचे प्रमाण प्रचंड गतीनं सुरू असल्याने लोकांच्यात भीती वाढली आहे.

बाधितांच्या प्रमाण वाढीबरोबर काही बाधितांचे मृत्यूही झाले आहेत. रहिमतपूर प्राथमिक आरोग्य केंद्रासह त्याच्या चार उपकेंद्रांना मर्यादा पडत आहे. तिच अवस्था वाठार किरोली प्राथमिक आरोग्य केंद्रासह त्याच्या उपकेंद्रांचीही आहे. सध्या लसीकरण मोहीम सुरू आहे. परंतु लशींचा अल्प पुरवठा होत असल्याने लोकांना प्राथमिक आरोग्य केंद्रात दिवसभर ताटकळत उभे राहावे लागत आहे. त्यानंतरही आपल्याला लशीचा नंबर येईल का नाही याची शाश्वती मिळत नाही. त्यामुळे वादावादीचे प्रकारही घडत आहेत.

कोरेगाव व खटाव तालुक्यांमध्ये लोकप्रतिनिधी कोरोना सेंटर उभारणीसाठी आघाडीवर आहेत. आपल्या मतदारसंघातील रुग्णांना योग्य उपचार मिळावेत यासाठी शासनाच्या माध्यमातून मिळाली तर ठीक आहे अन्यथा स्वतः पदरमोड करून कोरोना सेंटर उभारणीवर भर दिला जात आहे.खटाव तालुक्यातील पडळसारख्या गावात कोरोना सेंटर उभारण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य उपोषणाचा इशारा देऊन कोरोना सेंटर उभे करतो हे कौतुकास्पद आहे. कोरेगाव विधानसभा मतदारसंघात दोन आमदार कोविड सेंटर उभारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहेत. मात्र कऱ्हाड-उत्तर विधानसभा मतदार संघात रहिमतपूरसारख्या नगरपरिषदेच्या परिसरात कोरोना सेंटर उभारण्यासाठी कुणी धडपडत असल्याचे दिसून येत नसल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे. रहिमतपूरसह परिसरातील गावांतील कोरोना बाधित रूग्णाला बेड मिळवताना नाकीनऊ येत आहे.गैरसोय दूर करण्याची गरजकऱ्हाड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे आमदार पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना जनतेने आमदार म्हणून पाठींबा दिला आहे. कोरोनात लोकप्रतिनिधींकडून योग्य औषधोपचार आणि सोयीसुविधा मिळवून द्याव्या एवढीच माफक अपेक्षा जनतेची आहे. पालकमंत्र्यांनी रहिमतपूर येथे कोरोना बाधित रुग्णांची गैरसोय दूर करून दर्जेदार उपचार देण्यासाठी कोरोना सेंटरची उभारणी करावी, अशी मागणी होत आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSatara areaसातारा परिसर