शहरं
Join us  
Trending Stories
1
यवत हिंसाचारात कोणाचं किती नुकसान, सध्याची परिस्थिती कशी? जाणून घ्या ताजी अपडेट्स!
2
४० वर्षाच्या लढ्याला यश, कोल्हापूरला सर्किट बेंच मंजूर; मुंबई हायकोर्टाचे नोटिफिकेशन प्रसिद्ध
3
IND vs ENG : सिराजसह प्रसिद्ध कृष्णानं मारला 'चौकार'! यजमान इंग्लंडचा पहिला डाव अल्प आघाडीसह संपला
4
ऐसे लोग *** होते है! महबूब मुजावर यांचं नाव घेताच अरविंद सांवत संतापले!
5
IND vs ENG : मियाँ मॅजिक! ओव्हलच्या मैदानात DSP सिराजनं साजरं केलं 'द्विशतक'
6
National Film Awards: 'श्यामची आई' मराठी चित्रपटानं जिंकला राष्ट्रीय पुरस्कार, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी…
7
IND vs ENG : जो रुट अन् प्रसिद्ध कृष्णा यांच्यात राडा; भांडण सोडवायला आलेल्या पंचावर KL राहुल चिडला
8
Video: रागावलेल्या सिंहीणपुढे सिंहाचीच झाली 'शेळी'... जंगलच्या राजाची अवस्था पाहून तुम्हालाही येईल हसू
9
आव्वाज कुणाचा... मराठीचा !! 'या' मराठी चित्रपटांना मिळाला राष्ट्रीय पुरस्कार; पाहा विजेत्यांची यादी
10
शेतकऱ्यांसाठी मिळालेली रक्कम अधिकाऱ्यांनी कार खरेदीसाठी उडवली, कृषिमंत्री म्हणाले...   
11
तुर्भ्यात एनएमएमटीच्या भरधाव बसनं ६ जणांना उडवलं, चालकाविरोधात गुन्हा दाखल
12
शेतकऱ्यांच्या हिताशी तडजोड नाही, दबावाखाली करार करणार नाही, २५% टॅरिफबाबत भारताची स्पष्ट भूमिका
13
'किंग' खानच्या राजमुकुटाला राष्ट्रीय पुरस्काराचं 'कोंदण'; विक्रांत मेस्सी, राणी मुखर्जी यांचाही सर्वोच्च सन्मान
14
"पाकिस्तान एक दिवस भारताला तेल विकेल" म्हणत डोनाल्ड ट्रम्प यांनी डिवचलं, भारताची भूमिका काय?
15
Daya Nayak: थर्टी फर्स्टची रात्र अन् छोटा राजन गँगचे दोन शूटर; दया नायक यांच्या पहिल्या एन्काऊंटरची गोष्ट
16
Vivo T4R 5G: अवघ्या १७,४९९ रुपयांत विवोनं आणलाय जबरदस्त फोन, बघताच आवडेल!
17
'भारत-रशिया वेळोवेळी एकमेकांच्या बाजूने उभे', डोनाल्ड ट्रम्प यांच्या टीकेनंतर भारताचे प्रत्युत्तर
18
'फुटबॉलसम्राट' मेस्सी भारतात येणार.. रोहित, विराट, सचिनसोबत वानखेडेवर क्रिकेट मॅच खेळणार!
19
"माझ्याकडे मुस्लीम कामगार, कुणीतरी ओरडलं ही बेकरी..."; यवतमध्ये जमावाने जाळलेल्या बेकरीचं सत्य समोर
20
IND vs ENG : आता कसं वाटतंय...! डकेटचा वचपा काढल्यावर आकाशदीपनं त्याच्या खांद्यावर हात टाकला अन्... (VIDEO)

माढ्यातील घडामोडी मातब्बरांना धोकादायक! : घडामोडींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2018 00:28 IST

निर्मितीपासूनच चर्चेत राहिेलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय उलथापालथ वाढत चालली असून, राष्ट्रवादीमधील मातब्बर इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरणारी पावले पडू लागली आहेत. त्यामुळे

ठळक मुद्देमहत्त्वाकांक्षेमुळे निवडणूक अटीतटीची प्रस्थापितांव्यतिरिक्त दुसरा उमेदवार राष्ट्रवादीकडून शक्य

नितीन काळेल ।सातारा : निर्मितीपासूनच चर्चेत राहिेलेल्या माढा लोकसभा मतदारसंघात राजकीय उलथापालथ वाढत चालली असून, राष्ट्रवादीमधील मातब्बर इच्छुकांच्या आशेवर पाणी फेरणारी पावले पडू लागली आहेत. त्यामुळे आघाडीत मतदारसंघ राष्ट्रवादीकडे पुन्हा गेल्यास यावेळी मातब्बर घराण्याव्यतिरिक्त दुसराच कोणी उमेदवार असू शकतो. तर सातारा आणि सोलापूरमधील अनेकांच्या राजकीय महत्त्वाकांक्षा जोर धरू लागल्या आहेत. त्यामुळे माढ्याची निवडणूक पुन्हा एकदा अटीतटीची होणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघाची निर्मिती २००९ मध्ये झाली. या मतदारांघाचे नेतृत्व प्रथम राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले असून, सध्या विजयसिंह मोहिते-पाटील हे करत आहेत. तर यंदाही हा मतदारसंघ राष्ट्रवादीकडे जाण्याची शक्यता असून, यंदाही खासदार विजयसिंह मोहिते-पाटील इच्छुक आहेत. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांचेही नाव समोर येत असून, माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख हेही इच्छुक आहेत. तसेच जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी कोणतीही निवडणूक लढविण्यास तयार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे हक्काच्या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून अनेकजण दावे करू लागले आहेत. अशा घडामोडी घडत असताना या मातब्बर दावेदारांच्या विरोधात भक्कम पावले पडू लागली आहेत. याचे द्योतक हे टेंभुर्णीतील आमदार जयकुमार गोरे, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे माजी उपाध्यक्ष रणजितसिंह नाईक-निंबाळकर, सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संजय शिंदे, सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील, बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत, माळशिरसचे उत्तमराव जानकर यांच्या बैठकीत आहे.

सातारा जिल्ह्यात रामराजे नाईक-निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरे यांचे राजकीयदृष्ट्या पटत नाही. दोघेही संधी मिळाल्यास एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करत असतात. फलटणचेच रणजितसिंह नाईक-निंबाळकर हेही रामराजे विरोधकच आहेत. त्यामुळे रामराजेंना माढ्यातून उमेदवारी मिळाली तर गोरे व रणजितसिंह नाईक-निंबाळकर हे आघाडी धर्म पाळणार नाहीत, हे स्पष्ट आहे. टेंभुर्णीतील बैठक हेच स्पष्ट करते की रामराजेंना आमचा विरोध राहणार. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा असणारे शरद पवार यांनाही यावर विचार करावा लागणार आहे. माण, फलटणमधून विरोध होणार नाही, असाच उमेदवार त्यांना द्यावा लागणार आहे.

दुसरीकडे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील आणि उत्तमराव जानकर यांच्यात माळशिरसमधील राजकारणातून तिढा कायम आहे. जानकर यांची राजकीय ताकदही आहे. त्यामुळे जानकर हे मोहिते-पाटील यांच्यासाठी उपद्रवी ठरू शकतात. संजय शिंदे यांचीही मोहिते-पाटील विरोधक म्हणूनच गणना होते. शिंदे यांचा मोहिते-पाटील यांना ठामपणे विरोधच राहणार. तसेच शिंदे हे मोहिते-पाटील यांना पराभूत करण्यासाठी अधिकच प्रयत्न करतील, अशी सद्य:स्थिती आहे. सांगोल्याचे माजी आमदार शहाजीबापू पाटील हेही मोहिते-पाटील यांना सहकार्य करणार नाहीत. त्यामुळे हे सर्व एकत्र येऊन मोहिते-पाटील यांना पक्षाने पुन्हा उमेदवारी देऊ नये, अशीच दबावाची खेळी करत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

तसेच टेंभुर्णीत एकत्र आलेले सारेजण शेवटपर्यंत एकत्र राहिले तर त्यांच्यातील कोणीही उमेदवार ठरू शकतो. संजय शिंदे यांची ताकद माढा विधानसभा मतदारसंघात आहे. करमाळा विधानसभा मतदारसंघातही त्यांनी गट बांधला आहे. जिल्हा परिषद अध्यक्ष असल्याने त्यांचा जिल्ह्यात संपर्क आहे. त्यामुळे ते याचा वापर मोहिते-पाटील यांच्या विरोधासाठी करू शकतात. याचाच अर्थ मोहिते-पाटील यांना उमेदवारी मिळाल्यास निवडणूक सोपी जाणार नाही व वरिष्ठांनाही दुसऱ्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागणार आहे.दीपक साळुंखे, प्रभाकर देशमुखांत चर्चा...माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी माढा मतदारसंघातील गाठीभेटीवर जोर दिला आहे. दुष्काळाच्या निमित्ताने ते जनतेत मिसळू पाहत आहेत. त्यांचा हा सारा रोख लोकसभेसाठीच आहे. तसेच त्यांनी राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हाध्यक्ष व माजी आमदार दीपक साळुंखे यांची भेट घेतली. साळुंखे यांनीही पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. या दोघांनीही कोणालाही उमेदवारी मिळू द्या, आपण एकमेकांना सहकार्य करू, असे चर्चेत ठरले आहे. 

छुपा विरोध राहणार...करमाळा मतदारसंघात बागल गट, आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार जयवंतराव जगताप यांचा गट आहे. जगताप आणि आमदार पाटील हे मोहिते-पाटील यांना मदत करू शकतील; पण बागल गट हा मोहिते-पाटील यांना छुपा विरोध करणार, हे निश्चित आहे. तसेच शिवसेना-भाजप युती झालीतर आमदार पाटील यांची भूमिका बदलू शकते. 

सुभाष देशमुख यांचा निर्णय पक्षावर...सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी २००९ ला माढ्याची निवडणूक लढविली आहे. त्यावेळी चांगली मते घेतली होती. तसेच त्यांचा या मतदारसंघात संपर्क असतो. काही दिवसांपूर्वीच देशमुख करमाळ्याची बैठक करून माढ्याकडे जाताना कुर्डुवाडीत विश्रामगृहावर थांबले होते. त्यावेळी त्यांनी पक्षश्रेष्ठींनी कोठेही निवडणुकीसाठी लढायला सांगितले तर तयार आहे, असे सांगितले. यावरून ते माढ्यासाठी निवडणूक रिंगणात उतरू शकतात.

टॅग्स :PoliticsराजकारणSatara areaसातारा परिसर