संजीव वरे - वाई बाजार समितीवर आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील पुन्हा सत्ता आली असून काँग्रेस पुरस्कृत पॅनेलचा धुव्वा उडवला आहे. बाजार समितीचा हा निकाल काँग्रेसला आत्मपरिक्षण करायला लावणारा आहे.तालुक्यातील ग्रामपंचायतीचे निकाल जाहीर झाल्यानंतर आमदार मकरंद पाटील यांनीस्वत: प्रत्येक गावात जावून ग्रामपंचायत व सोसायटी मतदारांच्या वैयक्तिक गाठी घेतल्या होत्या. त्यामुळे काँग्रेसला ते वातावरण फोडता आले नाही. प्रत्येक जिल्हा परिषद गटात बावधनमधून शशिकांत पिसाळ, कवठे गटात सत्यजीत वीर, भुर्इंजमध्ये प्रमोद शिंदे, ओझर्डेमध्ये शशिकांत पवार, पसरणी गटात संजय मांढरे, दिलीप पिसाळ, शंकरराव शिंदे, मोहन जाधव, महादेव मस्कर, रमेश गायकवाड या सेनापतीनी आपआपला किल्ला लढविला. याउलट काँग्रेस व शिवसेनेचे नेते मतदारापर्यंत पोहचण्यात कमी पडले. कारखान्याच्या निवडणुकीतून राष्ट्रवादीने माघार घेतल्यानंतर काँग्रेस व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते संभ्रमावस्थेत होते. यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीत काही गावात काँग्रेस राष्ट्रवादीची युती पहावयास मिळाली. त्यामुळे दोन्ही पक्षातील कार्यकर्त्यांना मरगळ आली होती. यावर बाजार समितीच्या प्रचारार्थ आमदार पाटील यांनी मेळावा घेऊन सत्ता मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांना उत्साह भरला. अशाप्रकारे काँग्रेस किंवा शिवसेनेचे नेते नियोजन व सुसूत्रता दिसून आली नाही. त्यामुळे वाई बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पुरस्कृत पॅनेलच्या एक बिनविरोध व सर्वच्या सर्व १८ जागा मोठ्या मताधिक्याने जिंकून तालुक्यात राष्ट्रवादीचेच वर्चस्व असल्याचे ७० टक्के मते मिळवून दाखवून दिले आहे.या निवडणुकीतील पराजयाचे चिंतन काँग्रेस, शिवसेना, भाजपा यांना करण्याची वेळ आली आहे. तालुक्यातील ग्रामपंचायती व विकास सेवा सोसायट्या राष्ट्रवादीच्याच ताब्यात असल्याचे स्पष्ट केले आहे.परिश्रमाची गरजआगामी निवडणुकांसाठी राष्ट्रवादीचा प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेस असून त्याच्या नेतृत्वाला व पदाधिकाऱ्यांना काँग्रेस सक्षम करण्यासाठी मोठे परिश्रम घ्यावे लागणार आहेत. राज्यात सत्ता असूनही शिवसेना भाजपचे नेते तालुक्यात प्रभाव पाडू शकत नसल्याचे दिसून येत आहे.
पराभवामुळे काँग्रेसवर आत्मचिंतनाची वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2015 22:31 IST