शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

मोही ग्रामपंचायतीत महिलाच कारभारी, गावकऱ्यांचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 14:33 IST

Grampanchyat Elecation Women Satara- धावपटू ललिता बाबर व उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांच्या मोही ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अकरा महिलांची सर्वानुमते निवड केली असून, आता ग्रामपंचायतीचा कारभार महिलाच पाहणार आहेत. ​​​​​​​

ठळक मुद्देमोही ग्रामपंचायतीत महिलाच कारभारी, गावकऱ्यांचा निर्णय बिनविरोध निवडणुकीचा मार्ग मोकळा

म्हसवड : धावपटू ललिता बाबर व उपमहाराष्ट्र केसरी किरण भगत यांच्या मोही ग्रामपंचायतीमध्ये महिलाराज येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सदस्य पदासाठी अकरा महिलांची सर्वानुमते निवड केली असून, आता ग्रामपंचायतीचा कारभार महिलाच पाहणार आहेत.ललिता बाबर व किरण भगत या खेळाडूंचे गाव म्हणून मोही गावाची ओळख आहे. या गावाची ग्रामपंचायत निवडणूक मोठ्या चुरशीने लढली जाते. यावर्षी कोणत्याही परिस्थितीत ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करायचीच असा निर्धार ग्रामस्थांनी केला होता. मात्र, काही पारंपरिक राजकीय मंडळींची यंदाही फडात उतरण्याची आंतरिक इच्छा होती; पण गावाचा निर्णय त्यांनीही मान्य केला.ग्रामस्थांच्या बैठकीत गावातील ज्येष्ठ पाच मान्यवरांची एक समिती नेमण्यात आली. निवडणुकीबाबतचे सर्व अधिकार या कमिटीला देण्यात आले. या पाच सदस्यांनी घेतलेला निर्णय हा अंतिम असेल असे बैठकीमध्ये सर्वानुमते ठरले. त्यानुसार या पाच सदस्यांनी गावात महिलाराज आणण्याचा निर्णय घेतला. गावातील अकरा महिलांची सदस्य म्हणून अर्ज भरण्यासाठी निवड करण्यात आली.

यामध्ये मंदाकिनी राऊत, पद्मिनी देवकर, कल्पना पिसाळ, रसिका देवकर, सविता देवकर, शितल सुतार, पारुबाई नेटके, बायडाबाई मसगुडे, सुनीता जाधव, सुमन देवकर व वंदना पवार या अकरा महिलांचे उमेदवारी अर्ज भरण्यात आले आहेत. फक्त अकरा महिलांचेच अर्ज भरण्याचा निर्णय घेतल्यामुळे मोहीचा बिनविरोधचा मार्ग मोकळा झाला आहे. गावातील मान्यवर ज्येष्ठ मंडळी, आजी-माजी सदस्य, पदाधिकारी, पोलीस पाटील, महिला, ग्रामस्थ व युवा वर्ग यांनी बिनविरोधसाठी प्रयत्न केले. 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतElectionनिवडणूकWomenमहिलाSatara areaसातारा परिसर