शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात अतिवृष्टीचे थैमान, उभ्या पिकांचा चिखल, मुंबईत ५६ वर्षांतील तिसरा थंड दिवस
2
वक्फ कायद्याला ‘स्टे’ नाही, सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय; कायद्यातील तीन बदलांना अंतरिम स्थगिती
3
इ-बाईक टॅक्सीचा मार्ग अखेर मोकळा; पहिल्या १.५ किमीसाठी १५ रुपये भाडे, परिवहन विभागाकडून उबर, रॅपिडो कंपन्यांना तात्पुरते परवाने
4
अखेरच्या दिवशी आयटीआर भरणे रखडले, करदाते वैतागले : आयकर विभागाचा मुदतवाढीस नकार
5
वक्फ-दिलासा आणि खुलासा; कोर्टाने धार्मिक स्वातंत्र्यात ढवळाढवळ करण्याचा सरकारचा प्रयत्न हाणून पाडला
6
उपाशी लोक धनदांडग्यांना खुर्चीवरून खेचतात, तेव्हा..
7
‘जेएनपीए’त १२ कोटींचा पाकिस्तानी मुद्देमाल जप्त; मुंबई डीआरआयच्या पथकाची कारवाई, २८ कंटेनर जप्त; दोघांना अटक
8
‘डिएला’ म्हणते, मी पैसे खात नाही, कोणाला खाऊ देणार नाही!
9
राज कुंद्रांची ६० कोटींच्या फसवणूकप्रकरणी चौकशी; पुढील आठवड्यात पुन्हा हजर राहावे लागणार
10
अपहरणामध्ये पूजा खेडकरच्या वडिलांसह बाउन्सरचा हात; आई मनोरमा खेडकर यांच्यावरही गुन्हा दाखल
11
...तर बिहारमधील मतदार पुनरावलोकन प्रक्रिया रद्द करू : सर्वोच्च न्यायालय
12
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
13
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
14
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
15
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
16
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
17
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
18
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
19
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
20
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक

मातीतल्या कवितांच्या गंधाने मोहरला ग्रंथमहोत्सव

By admin | Updated: January 5, 2016 00:43 IST

उत्कृष्ट सादरीकरण : वास्तव स्थितीवर आधारित शब्द श्रृंखलांनी रसिकांची मने जिंकली

सातारा : येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगरीमध्ये आयोजित केलेल्या १७ व्या सातारा ग्रंथमहोत्सवात निमंत्रित कवींबरोबरच नवोदित कवींनी मातीतल्या कविता सादर करून रसिकांची मने जिंकली. वास्तव स्थितीवर आधारित कवितांच्या शब्द श्रृंखलांनी उपस्थित सातारकर रसिकांची मने जिंकली. या कवी संमेलनात उद्धव कानडे, धनंजय तडवळकर या निमंत्रित कवींसोबतच ज. तू. गार्डे, दिव्या जगदाळे, गणेश बोडस, ध्रुव पटवर्धन, प्रकाश फरांदे, माधुरी धायगुडे, शोभा जगदाळे, अ‍ॅड. संगीता केंजळे, किशोर धरपडे, कुणाल हेरकळ, प्रल्हाद पारटे, सुवर्णा म्हस्कर, प्रा. नंदकुमार शेडगे, अभिषेक जाधव, आयमन शेख, प्रा. बानुबी बागवान, सचिन पटवर्धन या कवींनी आपल्या कविता सादर केल्या. ‘जय जवान...जय किसान’ चा नाराच जणू या कवी संमेलनाच्या निमित्ताने ग्रंथमहोत्सवात घुमला. शाहू, फुले, आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांना परखड भाषेत सुनावले. ‘सरकारे बदलली तरी मानसिकता बदललेली नाही,’ असे भाष्य करून त्यांनी सोनियाचा दिनू नाही की शरदाचं चांदणं पडलं नाही. केंद्रात नरेंद्र अन् राज्यात देवेंद्र यांच्या येण्यानेही लोकांच्या जगण्यात फरक पडलेला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले. अंधश्रद्धेवर टीका करताना त्यांनी ‘देवाच्या दगडाला स्पर्श बाईचा चालेना,’ अशा शब्दात परखड भाष्य केलं. शहीद जवानाच्या मुलीच्या मनातील भावना व्यक्त करताना अतीत येथील विद्यालयाची दिव्या जगदाळे हिने ‘मनात काहूर उठते बाबा...तुमची आठवण येताना!’ अशा शब्दांत आपली कविता मांडली. या कवितेने उपस्थितांची मने हेलावली. शिरगावच्या कवयित्री सुवर्णा म्हस्कर यांनी शेतकऱ्यांचे दु:ख मांडलं. काबाडकष्ट करूनही शेतकरी उपाशीच राहतो. त्यांनी सोनियाचा दिवस कधी पाहायला मिळणार?, असे प्रश्नचिन्ह या कवयित्रीने उपस्थित केले. उद्धव कानडे यांनी देव-देवतांच्या नावाखाली चाललेली फसवेगिरी शब्दांत मांडली. ‘खेड्यातला काय अन् शहरातला काय, सगळ्यांनाच देवाकडं जायाचं हाय; पण कुणालाच कळंना देव कुठं हाय. देव वाऱ्यात हाय, देव पाण्यात हाय; पण देवाला कुणी जाणलंच नाय. साखर बी नाय अन् बकरा बी नाय, देवाजी निवद कधी खात नाय.’ अशा काव्यपंक्तीने त्यांनी प्रबोधनपर भाष्य केले. कवी संमेलनाचे सूत्रसंचालन कवी प्रदीप कांबळे यांनी केले. यावेळी नागरिक उपस्थित होते. (प्रतिनिधी)तीन कोटींच्या पुस्तकांची विक्रमी विक्रीसातारा : सातारा ग्रंथमहोत्सवाला यंदा १७ वर्षे पूर्ण झाली. या सातत्यपूर्ण साहित्य चळवळीमुळे वाचनसंस्कृतीला बळ मिळाले आहे. यंदाच्या गं्रथोत्सवात तीन कोटींची उलाढाल झाल्याची माहिती ग्रंथ महोत्सवातील स्टॉलच्या संयोजिका सुनीताराजे पवार यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. गं्रथमहोत्सवाला ३१ डिसेंबरला सुरुवात झाली. पुढच्या तीन दिवसांत ग्रंथ विक्रीच्या स्टॉल्सवर खरेदीसाठी साहित्यपे्रमींची झुंबड उडाली. यंदाच्या ग्रंथमहोत्सवामध्ये ११२ स्टॉल्स उभारण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने ग्रंथांचे स्टॉल्स बहुसंंख्येने होते. ई-लर्निंग, कॉम्प्युटरच्या स्टॉल्सनेही या ठिकाणी हजेरी लावली होती. ग्रंथमहोत्सवाला १७ वर्षांपूर्वी सुरुवात झाली. या ग्रंथमहोत्सवात ग्रंथांच्या विक्रीचा आलेख वाढतच चालला असून, यंदा ग्रंथांची विक्रमी विक्री झाली. रहस्य कथा, व्यक्तिविशेष, पौराणिक कादंबऱ्या, पाक कलेची पुस्तके, मुलांना आवडणाऱ्या गोष्टी या पुस्तकांसोबतच आता करिअरची नवी संधी शोधून देणारी सामान्य ज्ञानाची पुस्तकेही या ग्रंथ महोत्सवात उपलब्ध झाल्याने स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना ही पर्वणी ठरली. महाविद्यालयाची पदवी घेत असलेले विद्यार्थीही १९५० च्या दशकातल्या कादंबऱ्यांवर तितकेच लक्ष ठेवून आहेत. सलग १७ वर्षे सातत्याने चाललेला महोत्सव महाराष्ट्रात इतर कुठेही पाहायला मिळत नसल्याने साताऱ्याच्या या साहित्य प्रयोगामुळे दर्जेदार साहित्य लोकांपर्यंत पोहोचते. (प्रतिनिधी) कादंबरीची मोहिनी ४विश्वास पाटील लिखित ‘लस्ट फॉर लालबाग’ व खा. शरद पवारांच्या जीवनावर आधारित ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकांना वाचकांची मोठी मागणी असल्याचे पाहायला मिळाले. शिवाजी सावंत यांनी ‘मृत्युंजय’, ‘छावा’, ‘युगंधर’, रणजित देसाई यांची ‘स्वामी’, विश्वास पाटील यांची ‘पानिपत’, ‘झाडाझडती’, ‘महानायक’, ‘पांगिरा’, वि. स. खांडेकरांची ‘ययाती’ या कादंबरींची मोहिनी सातारच्या तरुणाईवर कायम असल्याचे यंदाही स्पष्ट झाले.