पाचगणी : पाचगणीतील व्यापाऱ्यांच्या आंदोलनापुढे अखेर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना नमावे लागले. व्यापाऱ्यांनी रस्त्याच्या प्रश्नावर पुकारलेल्या बंदला नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने नागरिकांच्या एकीने आज, बुधवारी डांबरीकरणाला सुरुवात झाली.पाचगणीतील नागरिकांना सार्वजनिक बांधकाम विभागाने तसेच लोकप्रतिनीधींनी शेवटपर्यंत तोंंडाला पाने पुसण्याच्या प्रयत्न चालविला होता. संतप्त झालेल्या व्यापाऱ्यांनी बैठक घेऊन या प्रश्नाचा तडा लावण्याचा निर्धार केला आणि बेमुदत पाचगणी बंदची हाक दिली. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा निर्णय घेतला. त्यानुसार आंदोलनाची सुरुवात केली. पहिल्या दिवशी मंगळवारी पूर्णपणे बाजारपेठ बंद ठेवण्यात आली. यावेळी आक्रमक झालेले व्यापारी दुपारी एकत्र जमले; पंरतु नागरिकांचा रुद्रावतार पाहून बांधाकाम विभागाचे अभियंता पाटस्कर यांनी हे वाढवायचे का? असा खडा सवाल केल्याने व्यापारी आणखी संतप्त झाले. प्रकरण चिघळण्याच्या तयारीत असतानाच सहायक पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांनी नागरिकांना शांत केले. नागरिकांच्या या विरोधापुढे अधिकाऱ्यांना अखेर नमते घ्यावे लागले. डांबरीकरणासाठी रस्त्याची साफसफाई करण्याचेचे काम दिवसभर कामगारांना करावे लागले. तांत्रिक अडचणींची माहिती अधिकाऱ्यांनी सांगितली; पंरतु लोक ऐकण्याच्या तयारीत नव्हते. बुधवारी बाजार असला तरी आम्ही बंद ठेवणार आहे. जोपर्यंत काम सुरू करीत नाही, तोपर्यंत आम्ही आमचे आंदोलन चालूच ठेवणार, असा निर्धार केल्याने अधिकाऱ्यांनाही काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. बुधवारी दिवसभर पाचगणी शहरात याचीच चर्चा सुरू होती. (वार्ताहर)दुपारपासून बाजारपेठ सुरूआज बुधवारी सकाळी आठवडे बाजार असूनही बंद कायम ठेवण्यासाठी व्यापाऱ्यांचा आग्रह धरल्याने सकाळपासून बाजारपेठ बंद ठेवली गेली. सकाळी ११ वाजता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्यांचा फौजफाटा पाचगणीत दाखल झाला. पोलीस ठाण्यापासून खडी अंथरूण डांबरीकरणाला सुरुवात झाली. यावेळी व्यापारी शांत झाले व दुपारी एक वाजल्यापासून बाजारपेठ खुली करण्यात आली.
आंदोलनकर्त्यांपुढे अधिकाऱ्यांचे नमते
By admin | Updated: September 25, 2014 00:33 IST