शहरं
Join us  
Trending Stories
1
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
2
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
3
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
4
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
5
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
6
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
7
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
8
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
9
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
10
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
11
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
12
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
13
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
14
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
15
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
16
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
17
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
18
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
19
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
20
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामसभेत जिल्हाधिकाऱ्यांचा ‘मोबाईल स्पीकर आॅन’ आदेश

By admin | Updated: July 21, 2016 23:32 IST

फरांदवाडी : जनावरांच्या मृत्यूप्रकरणी थेट जिल्हाधिकाऱ्यांश्ी संवाद

वाठार निंबाळकर : अज्ञात रोगाने अकस्मात मरण पावणाऱ्या जनावरांच्या घटनेचा तत्काळ पंचनामा करावा, असा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी थेट मोबाईलवरून फरांदवाडीच्या ग्रामसभेत गटविकास अधिकाऱ्यांना दिला. या ग्रामसभेत गामस्थांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांना फोन लावला होता. त्यानंतर मोबाईलचा स्पीकर आॅन करून जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांनी स्थानिक अधिकाऱ्यांना दिलेला आदेश ग्रामसभेत ऐकवला गेला. ‘आमचा गाव आमचा विकास’ या आराखड्याअंतर्गत फरांदवाडी, ता. फलटण गावात तीन दिवसीय कार्यक्रमात दोन कोटी तीस लाख सोळा हजार रुपयांचा विकास आराखडा करण्याच्या कामांची गटविकास अधिकारी विजयसिंह जाधव यांच्याकडून प्रशंसा करण्यात आली आहे. तीन दिवसीय या कार्यक्रमांमध्ये मशाल फेरी, प्रभात फेरी, शिवार फेरी व सांगता कार्यक्रमावेळी गटविकास अधिकारी विजयसिंंह जाधव यांच्या उपस्थितीत ग्रामसभा झाली. यावेळी विस्तार अधिकारी सी. एस. शिंदे, प्रशिक्षक आर. टी. ढेकळे, ग्रामसेवक गणेश दडस, सरपंच सविता नाळे, उपसरपंच दीपाली कोरपडे, कांताकाका भोसले उपस्थिती होती.गावात सार्वजनिक बांधकाम विभागाच्या जमिनीमधील काही जागा गावाला मिळण्याचा ठराव केला. त्याला गटविकास अधिकारी यांनी जागा मिळवून देण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.ग्रामसभेला सदस्या सोनाली बोराटे, बेबीताई टिळेकर, पूजा फरांदे, राजेंद्र नाळे, प्रभाकर कर्णे, राकेश शिंदे, मोहन नाळे, विठ्ठल हिंगणे, राजेंद्र राऊत, विकास फरांदे व ग्रामस्थ उपस्थित होते. (वार्ताहर)या कामांना संमती..!ग्रामसभेमध्ये शिक्षण विभागाचा २३ लाख रुपये, अंगणवाडी विभाग ८ लाख रुपये, रस्ते विभाग ८९ लाख पन्नास हजार रुपये, पाणीपुरवठा विभाग ५० लाख रुपये, रोडलाईट ३ लाख १० हजार रुपये, आरोग्य विभाग ३ लाख २१ हजार, कृषी विभाग ३० लाख रुपये व इतर कामे २९ लाख ५० हजार रुपयांचा आराखडा सर्व संमतीने ग्रामसभेमधून तयार करण्यात आला.