शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

मतदारसंघातील सुविधांबाबत आमदारांनीच लक्ष घालावे : रामराजे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 18:30 IST

CoronaVIrus In Satara Ramraje : तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध आरोग्याच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. आपल्या तालुक्यात आणखीन कोणत्या सुविधा पाहिजेत, यासाठी आमदारांनी स्वत: लक्ष घालून आणखीन सुविधा निर्माण कराव्यात, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.

ठळक मुद्देमतदारसंघातील सुविधांबाबत आमदारांनीच लक्ष घालावे : रामराजेकोरोना आढावा बैठकीत तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी नियोजन करण्याचे आवाहन

सातारा : तिसऱ्या लाटेच्या मुकाबल्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विविध आरोग्याच्या सुविधा निर्माण केल्या जात आहेत. आपल्या तालुक्यात आणखीन कोणत्या सुविधा पाहिजेत, यासाठी आमदारांनी स्वत: लक्ष घालून आणखीन सुविधा निर्माण कराव्यात, असे विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी सांगितले.जिल्ह्यातील कोरोना संदर्भातील आढावा बैठक येथील जिल्हा परिषदेच्या स्व. यशवंतराव चव्हाण सभागृहात विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या वेळी ते बोलत होते.

या आढावा बैठकीला पालकमंत्री बाळासाहेब पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, जिल्हा परिषद अध्यक्ष उदय कबुले, आमदार दीपक चव्हाण, आमदार महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील थोरवे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण, प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन पाटील यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.ज्या ठिकाणी कोरोनाचे टेस्टिंग होते त्या ठिकाणी गर्दी होत आहे, ही गर्दी कमी करण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना करून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, जिल्ह्यामध्ये ऑक्सिजन प्लॅन्ट उभे केले जात आहेत. त्यांना लवकरात लवकर कार्यान्वित करावे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत कुणीही आरोग्य सुविधेपासून वंचित राहणार नाही, यासाठी आतापासूनच तयारी करा, असेही त्यांनी बैठकीत सांगितले.सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या जिल्ह्यांमधील पॉझिव्हिटीचा रेट कमी होताना दिसत नाही, ही चिंतेची बाब आहे. लग्न समारंभ व इतर कार्यक्रमांमध्ये कुठेलेही नियम पाळले जात नाहीत. प्रत्येकाने मास्कचा वापर, सुरक्षित अंतर व वेळोवेळी हाताची स्वच्छता केली पाहिजे. अनावश्यक घराच्या बाहेर पडू नये तसेच बाजारपेठांमध्ये गर्दी करू नये, असे आवाहन पालकमंत्री बाळसाहेब पाटील यांनी केले. बैठकीत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोनासंदर्भात जिल्हा प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकरcollectorजिल्हाधिकारीSatara areaसातारा परिसर