शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

खासदारांचे काम म्हणजे..., शिवेंद्रराजे भोसलेंचे उदयनराजेंना प्रत्युत्तर 

By दीपक देशमुख | Updated: April 18, 2023 15:55 IST

राज्यातील घडामोडीबाबत वेट ॲंड वाॅच भुमिका

सातारा : सातारा मेडिकल कॉलेजचे काम काही राजकीय नेत्यांच्या सांगण्यावरून काहीजणांनी काम बंद पाडले. ठेकेदाराला त्रास देवून आर्थिक मागणी होत. त्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांनी मेडिकल कॉलेजच्या कामाला संरक्षण द्यावे. तसेच कोणताही खाणपट्टा नसताना, रॉयल्टी न भरता खिंडवाडीतील उत्खनन सुरू आहे. त्याची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी केली. तसेच खासदार कमी बोलतात पण त्यांचे काम हे मी नाही त्यातली अन् कडी लावा आतली, अशा पद्धतीचे असल्याचा टोलाही आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला.सातारा येथे जिल्हाधिकारी यांची भेट घेवून झालेल्या बैठकीची माहिती पत्रकारांना देताना ते बोलत होते. यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी आदल्या दिवशी खा. उदयनराजे भोसले यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिले. आ. शिवेद्रराजे भोसले म्हणाले, खा. उदयनराजेंचे लोक बाजार समितीच्या सत्तेतून दंगा करून बाहेर पडले. सचिव मनवे यांच्याबद्दल ते बाेलत असले तरी काेर्टाने मनवेंच्या बाजून निकाल दिला. त्यानंतरच त्यांना कामावर हजर करून घेतले आहे. त्यामुळे कोर्टाचा निकाल त्यांना मान्य नाही काय. ते कोर्टापेक्षा मोठे आहेत काय ? ते म्हणतील तेच खरे काय ? असा सवाल त्यांनी केला.बाजार समितीच्या सतरा एकर जागेचा सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिलेला आहे. जागेचा ताबा आमचा असून सातबाऱ्यावर बाजार समितीचे नाव लागले आहे. काही लोकांचा प्रयत्न ही जागा परत मिळावी, त्याचे प्लॉट पाडून कोट्यवधी कमावण्याचा इरादा होता. पण, आमची साथ मिळाली नाही म्हणून ते बाजूला झाले. आमचा हेतू बाजारपेठ वाढावी हा आहे. निवडणुकीनंतर फळे व भाजीपाला मार्केट, व्यवसायिक गाळे, जनावरांचा दवाखाना, सुसज्ज पार्किंग असा अद्ययावत प्लॅन केला आहे. बाजार समिती शहराबाहेर गेल्यास मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना शहरात होणारी वाहतूक कोंडीचा प्रश्नही सुटेल, असे आ. शिवेंद्रराजे म्हणाले.

राज्यातील घडामोडीबाबत वेट ॲंड वाॅच भुमिकाराज्यात सुरू असलेल्या घडामोडीबाबत पत्रकारांनी छेडले असता आ. शिवेंद्रराजे भाेसले म्हणाले, हा भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांच्या अखत्यारीतील विषय आहे. पण वरिष्ठांच्या आदेशानुसार पुढची वाटचाल ठेवू. सध्या तरी याबाबत वेट ॲंड वॉचच्या भुमिकेत आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसले