शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
2
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
3
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
4
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
5
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
6
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
7
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
8
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
9
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
10
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
11
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
12
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
13
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
14
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
15
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
16
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
17
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
18
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
19
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
20
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार

आमदार आदर्श गावाला मिळतंय बारा दिवसांनी पाणी

By admin | Updated: April 2, 2017 16:36 IST

देऊरकर हैराण : ग्रामपंचायतीच्या गलथान कारभारामुळे अनेकांची पाण्यासाठी वणवण

आॅनलाईन लोकमतवाठार स्टेशन , दि. २ : कोरेगाव तालुक्याच्या उत्तर दुष्काळी भागातील आमदार आदर्श देऊर गाव सध्या पाणी टंचाईने हैराण झाले आहे. या गावाला ग्रामपंचायतीच्या गलथानपणामुळे आठवड्यातून केवळ तासभर पाणी मिळत आहे. दोन वर्षांपूर्वी कोरेगावच्या आमदारांनी या गावाला दत्तक घेण्याचा निर्णय घेत गाव विकासाचा आदर्श आराखडा बनवला. मात्र, या आराखड्यातला विकास कागदावर आणि बैठकीपुरताच मर्यादित राहिला आहे.शासनाच्या आदेशाप्रमाणे जाहीर झालेल्या आमदार आदर्श गाव योजनेला आज जवळपास दोन वर्षांचा काळ लोटला. या गावाला शासन विषेश सहकार्य करणार असल्याने ज्या गावांची या योजनेत निवड झाली त्या गावांनी सुरुवातीलाच दिवाळी साजरी केली. कोरेगाव विधानसभा मतदार संघातील देऊर हे मोठ्या लोकसंख्येचा गाव आमदार शशिकांत शिंदे यांनी दत्तक घेत या गावाच्या पालकत्वाची जबाबदारी स्वीकारली. सुरुवातीच्या काळात गावच्या विकासासाठी आराखडा बनवला. रस्ते, पाणी या बरोबर गावचा सर्वांगीण विकास कसा होणार, या बद्दल जनजागृती झाली. त्यानुसार शासकीय अधिकाऱ्यांच्याही बैठका झाल्या. या अधिकाऱ्यांनीही अधिकाधिक निधी या गावाला देण्याबाबत प्रयत्न केला.आमदार आदर्श गाव दत्तक घेतल्यानंतर या गावची पंचवार्षिक निवडणूकही गावाने बिनविरोध करण्याची महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, या निवडणुकीनंतर गावाला दिशादायी नेतृत्वच उरलं नसल्याने आज अनेक समस्यांनी गावकरी हैराण आहेत. एकाच पक्षात अनेक गटतटामुळे गावचा विकास आज ही ठप्प आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे गावासाठी कोणतीही शास्वत अशी पाणी योजना आजही अस्तित्वात नाही. तर असणाऱ्या पाणी योजनेतून सुटलेलं पाणी ग्रामस्थांना कोणत्या परस्थितीतून मिळवावं लागतंय ही वेगळीच समस्या ग्रामस्थ अनुभवत आहेत.ग्रामस्थांमधून संताप व्यक्त एका बाजूने ग्रामपंचायतीच्या करवसुलीसाठी स्पिकर लावून ग्रामस्थांना कोर्टात पाठवण्याची भूमिका घेणाऱ्या ग्रामपंचायतीने आज गावाला पाणी देण्याबाबत मात्र उदासीन भूमिका घेतल्याने ग्रामस्थातून मात्र संताप व्यक्त होत आहे. उपलब्ध पाणी नियोजनाच्या अभावामुळे अनेकांना मिळत नाही.पाणी समस्येची पाहणी करावी...ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी ग्रामस्थांना मोठे हाल सोसावे लागत आहे. या पाणी समस्येची एकदा कोरेगाव पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांनी पाहणी करावी, अशी मागणी ही देऊर ग्रामस्थ करत आहेत. आमदार आदर्श गावची सर्वात आवश्यक असणारी पाणी समस्या सोडविण्याबाबत तत्काळ आमदारांनी बैठक आयोजित करून या गावाचा किमान पाणीप्रश्न तरी सोडवावा, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.