शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
2
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
3
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
4
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
5
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
6
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
7
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
8
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
9
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
10
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
11
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
12
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
13
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
14
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
15
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
16
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
17
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर
18
सारा तेंडुलकरची मैत्रीण बनली दिल्ली प्रीमियर लीगची स्पोर्ट्स अँकर, कोण आहे 'ती'? जाणून घ्या
19
मोटो जी ८६ पॉवर 5G भारतात लॉन्च, जाणून घ्या खिसियत आणि किंमत!
20
ड्रग्ज पार्टीच्या कारवाईचे व्हिडिओ व्हायरल कोणी केले? रोहिणी खडसे यांचा पोलिसांना सवाल

अन्याय माझ्यावर नाही, पण..; मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांचे शरद पवार यांच्यावर टीकास्त्र  

By प्रमोद सुकरे | Updated: December 24, 2024 17:51 IST

रामराजे कोणत्या पक्षात ते मला माहित नाही, मंत्री गोरे यांची बोचरी टीका

कराड : सातारा जिल्ह्यात एकेकाळी एकाच पक्षाला सगळे आमदार, खासदार निवडून मिळत होते. मात्र असे असूनही जिल्ह्याला मंत्रीपद मिळत नव्हते अशी खंत होती. आज भाजपने मात्र जिल्ह्याला भरभरून दिले आहे असे मत बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केले. त्यावर तुम्हाला शरद पवारांनी अन्याय केला असे म्हणायचे आहे का? असे छेडले असता माझ्यावर नव्हे पण माझे वडील अभयसिंहराजे भोसले यांच्यावर त्यांनी अन्याय केला. त्यांना नेहमीच मंत्रीपदापासून बाजूला ठेवले. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाचे नुकसान तर झालेच पण जिल्ह्याचेही नुकसान झाले असे म्हणत त्यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली.मंत्री शिवेंद्रराजे भोसले कराड येथे दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन करण्यासाठी आले होते. त्यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, आमदार डॉ. अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे, भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आदींची उपस्थिती होती.बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, उदयनराजे भोसले हे तर आमचे खासदार आहेत. माझे आणि उदयनराजे यांचे वैयक्तिक कोणतेही भांडण नाही. पण नगरपालिकेच्या निवडणुकीला दोघांचेही कार्यकर्ते उमेदवारीसाठी हट्ट धरतात. त्यावेळी किरकोळ कुरबुरी होत राहतात. यापुढे आम्ही व्यवस्थित मिटवू.त्यामुळे दोघांच्या संघर्षाचा विषय नाही. रामराजे कोणत्या पक्षात ते मला माहित नाहीग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना माध्यम प्रतिनिधींनी तुमच्याकडेही तुमच्या मित्र पक्षाचे रामराजे नाईक निंबाळकर नेते आहेत. तुमचे आणि त्यांचेही मिटले असं समजायचं का? असे छेडले. त्यावर आता आम्ही संघर्ष करायचा टाळला आहे. पण रामराजे निंबाळकर हे कोणत्या पक्षात आहेत हे त्यांनाही माहित नसेल आणि मलाही माहित नाही अशी बोचरी टीका गोरे यांनी केली. तर रामराजे म्हणजे फलटण नव्हे असेही त्यांनी एका प्रश्नावर बोलताना आवर्जून सांगितले. 

मोठ्या भावांचे कराडवर लक्ष राहणार ना? यावेळी कराडला मंत्रीपद नाही त्यामुळे तुम्ही थोरले भाऊ आहात. कराडवर व्यवस्थित लक्ष राहणार ना? असा प्रश्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी दोन्ही मंत्र्यांना केला. त्यावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शंभर टक्के असे उत्तर देणे पसंत केले. पण मंत्री जयकुमार गोरे यांनी मात्र एका जिल्ह्याचे असे दोन भाग करणे योग्य नाही. आम्ही यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतिस्थळी अभिवादन केले आहे. त्यांनी सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची शिकवण दिली आहे. याची आठवण करुन दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडShivendrasinghraja Bhosaleशिवेंद्रसिंहराजे भोसलेSharad Pawarशरद पवारJaykumar Goreजयकुमार गोरेRamraje Naik-Nimbalkarरामराजे नाईक-निंबाळकर